अनवाँटेड किट

अनवाँटेड-किट गर्भपाताच्या गोळीचा भारतातील एक सर्वाधिक लोकप्रिय ब्रँड आहे. हे मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टॉल अशा दोन गोळ्यांच्या संचात उपलब्ध असते. आपल्याला जर अनवाँटेड-किट कसे काम करते, त्याची किंमत किती आहे, डोस किती आहे आणि ते कुठे मिळेल याविषयी काही चिंता असेल, तर आम्हाला वाटते हे मार्गदर्शक तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. जर आपल्याला अजून काही प्रश्न विचारायचे असतील, तर कृपया आमच्या समुपदेशकांशी ईमेल किंवा लाईव्ह चॅटद्वारे संपर्क साधा.

अनवाँटेड-किट म्हणजे काय?

अनवाँटेड-किट हे दोन औषधांनी मिळून बनलेले असते – मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टॉल – ज्यांचा उपयोग गर्भधारणेच्या 11 आठवड्यांपर्यंत. गर्भपात करण्यासाठी केला जातो. मिफेप्रिस्टोन गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या गर्भधारणा हार्मोन्सना रोखते आणि मिसोप्रोस्टॉल गर्भाशयग्रीवा मऊ करते आणि गर्भाशय आकुंचित होऊन गर्भ बाहेर पडतो. Mankind Pharma Ltd. यांनी ह्याची निर्मिती केलेली आहे. [1]

गर्भधारणा संपवण्यासाठी अनवाँटेड-किट कसे कार्य करते?

अनवाँटेड-किट पॅक हे गर्भपाताच्या दोन गोळ्यांनी मिळून बनलेले असते. मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टॉल.

मिफेप्रिस्टोन मुळे गर्भाची वाढ होण्यासाठी आवश्यक असलेल्या नैसर्गिक हार्मोन प्रोजेस्टेरॉनचा परिणाम रोखला जातो. यामुळे गर्भाची वाढ होणे थांबते आणि यामुळे गर्भाशय आकुंचित होते आणि गर्भाशयग्रीवा मऊ होऊन मोठी होण्यास तयार होते. साधारणपणे, ते वापरल्यानंतर 24-48 तासांमध्ये काम करण्यास सुरुवात करते. [2]

मिसोप्रोस्टॉल मुळे गर्भाशयग्रीवा मऊ होऊन मोठी होते आणि त्यामुळे गर्भाशय आकुंचनही पावते. ह्या सर्व कृतींमुळे गर्भ बाहेर पडण्यास मदत होते. साधारणपणे ते वापरल्यानंतर ~1 तासाने काम करण्यास सुरुवात करते, पण त्यापेक्षा जास्त वेळही लागू शकतो. [2]

अनवाँटेड-किटचा डोस किती असतो?

अनवाँटेड-किटमध्ये मिफेप्रिस्टोनची (200mg) 1 गोळी आणि मिसोप्रोस्टॉलच्या चार (प्रत्येकी 200mcg, म्हणून एकूण 800mcg) गोळ्या असतात. गर्भधारणा किती दिवसांची आहे यावर आधारित डोसची शिफारस केली जाते.

6 आठवड्यांच्या आतील गर्भधारणेसाठी अनवाँटेड-किटचा डोस किती आहे?

6 आठवड्यांच्या आतील गर्भधारणेसाठी शिफारस केलेला अनवाँटेड-किटचा डोस आहे, मिफेप्रिस्टोन (200mg) 1 गोळी आणि मिसोप्रोस्टॉलच्या 4 गोळ्या (एकूण 800 mcg) काही बाबतीत, मिसोप्रोस्टॉलच्या 4 अतिरिक्त गोळ्या जवळ ठेवण्याची शिफारस केली जाते (एकूण 1600 mcg). [3]

9 आठवड्यांच्या आतील गर्भधारणेसाठी अनवाँटेड-किटचा डोस किती आहे?

9 आठवड्यांच्या आतील गर्भधारणेसाठी शिफारस केलेला अनवाँटेड-किटचा डोस आहे मिफेप्रिस्टोन (200mg) 1 गोळी आणि मिसोप्रोस्टॉलच्या 4 गोळ्या (एकूण 800mcg). काही बाबतीत, मिसोप्रोस्टॉलच्या 4 जादा गोळ्या जवळ ठेवण्याची शिफारस केली जाते (एकूण 1600mcg). [3]

9 ते 11 आठवड्यांपर्यंतच्या गर्भधारणेसाठी अनवाँटेड-किटचा डोस किती आहे?

9-11 आठवड्यांदरम्यानच्या गर्भधारणेसाठी शिफारस केलेला अनवाँटेड-किटचा डोस आहे मिफेप्रिस्टोन (200mg) 1 गोळी आणि मिसोप्रोस्टॉलच्या 4 गोळ्या (एकूण 800mcg), परंतु शक्य असेल, तर मिसोप्रोस्टॉलच्या उपलब्ध असलेल्या एकूण 8 (1600 mcg) जादा गोळ्या घेण्याची शिफारस केली जाते, कारण त्यामुळे यशस्वी होण्याचा दर वाढतो [4], [5]

अनवाँटेड-किटची किंमत किती आहे?

अनवाँटेड-किटच्या १ पॅकची किंमत नेहमी कमीच असते, पण ती भौगोलिक ठिकाणानुसार बदलेल. वेगवेगळ्या देशांचे गर्भपाताविषयीचे कायदे वेगवेगळे असतात आणि यामुळेही किटच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो. भारतात अनवाँटेड-किटची किंमत सुमारे 386 रुपये ते 400 रुपये एवढी असते. [1]

अनवाँटेड-किट कसे घ्यावे?

अनवाँटेड-किटमध्ये 1 मिफेप्रिस्टोन गोळ्या आणि 4 मिसोप्रोस्टॉल गोळ्या असतात.

प्रथम तुम्ही मिफेप्रिस्टोन गोळी (200mg) पाण्यासोबत गिळावी. मिफेप्रिस्टोन गोळी घेतल्यानंतर पहिल्या 30 मिनिटांच्या आत जर तुम्हाला उल्टी आली तर ही गोळी लागू पडणार नाही अशी शक्यता असते आणि तुम्हाला मिफेप्रिस्टोनची दुसरी गोळी घ्यावी लागेल.

मिफेप्रिस्टोनची गोळी घेतल्यानंतर 24-48 तास वाट पहा.

त्यानंतर तुमच्या जिभेखाली (सबलिंगुअल पद्धतीने) मिसोप्रोस्टॉलच्या 4 गोळ्या ठेवा आणि त्यांना 30 मिनिटे विरघळू द्या. 30 मिनिटांनंतर गोळीचा काही भाग तोंडात राहिला असल्यास तो गिळण्यासाठी तुम्ही पाणी पिऊ शकता. [1], [2]

संपूर्ण प्रोटोकॉल पाहण्यासाठी आमच्या पृष्ठा ला भेट द्या किंवा आमच्या समुपदेशकांशी संपर्क साधा.

अनवाँटेड-किटचे साइड इफेक्ट कोणते आहेत?

गर्भपातासाठी उपयोग केल्यास मिसोप्रोस्टॉलचे दुष्परिणाम म्हणजे पोटात दुखणे आणि रक्तस्राव होणे असे असतात. मळमळ आणि उल्ट्या यांसारखी गरोदरपणाशी संबंधित लक्षणे मिफेप्रिस्टोन घेतल्यानंतर वाढू शकतात आणि मिसोप्रोस्टॉल घेतल्यानंतर पुन्हा वाढू शकतात, पण गर्भपाताच्या प्रक्रियेदरम्यान ती कमी होतील आणि निघून जातील. त्याव्यतिरिक्त, अतिसार, ताप आणि थंडी वाजणे यांसारखे दुष्परिणाम होणे शक्य आहे. [5]

साधारणपणे रक्तस्राव सुमारे 12-14 दिवस टिकतो आणि इतर लक्षणे 24 तासांपर्यंत टिकतात. [1]
दुष्परिणामांविषयी तुम्हाला येथे अधिक शिकता येईल.

अनवाँटेड-किट कशासारखे दिसते?

अनवाँटेड-किट सामान्यपणे पांढऱ्या रंगाचे असते.
मिफेप्रिस्टोन गोळी (२००mg) पिवळसर रंगाची आणि दंडगोलाकार असते.
मिसोप्रोस्टॉलच्या 4 गोळ्या (प्रत्येकी 200mcg) ह्या आकाराने लहान, पांढऱ्या रंगाच्या आणि लंबगोलाकार असतात.

अनवाँटेड-किटमधील गोळ्या कशा असतात?

अनवाँटेड-किट गर्भपाताच्या गोळ्यांची उपलब्धता भौगोलिक ठिकाणांनुसार बदलत असते. यासाठी औषधाच्या दुकानात मेडिकल प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता भासू शकते.

तुम्ही ईमेल किंवा लाईव्ह चॅटद्वारे आमच्या समुपदेशकांशी संपर्क साधू शकता आणि ते तुम्हाला तुमच्या जवळचा विश्वासू दुकानदार शोधून देण्यास मदत करू शकतात.

लेखक:

by the safe2choose टीम आणि कॅराफेम मधील समर्थन देणार्‍या तज्ञांद्वारे, द नॅशनल अबॉर्शन फंड (NAF) यांच्या 2020 च्या शिफारसी आणि Gynuity च्या 2019 च्या शिफारसींवर आधारित.

द नॅशनल अबॉर्शन फंड (NAF) ही दक्षिण अमेरिकेतील गर्भपाताविषयक सेवा पुरविणारी संस्था आहे.

कॅराफेम गर्भपातासाठी आणि कुटुंब नियोजनासाठी सोयीस्कर आणि व्यावसायिक निगा पुरवतात, ज्यामुळे लोक त्यांच्या मुलांमध्ये अंतर ठेवू शकतात आणि संख्येवर नियंत्रण ठेवू शकतील.

Gynuity हे पुनरुत्पादनविषयक आणि मातांच्या आरोग्याविषयी वैज्ञानिक, चिकित्सालयीन आणि कार्यक्रमबद्ध पुरावे विकसित करतात आणि त्याचा वापर करण्यासंबंधी प्रचार करतात, ज्यात प्रत्येक व्यक्तीला वैद्यकीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या फळांचा लाभ मिळेल असे आश्वासन देतात.


स्रोत

[1] 1mg. (2020). Unwanted Kit Tablet. Kanwar, B. S., & Kanodia, L. येथून मिळवले: https://www.1mg.com/drugs/unwanted-kit-tablet-267798

[2] Jani, P. S. (2018). Use of MTP kit (Mifepristone and Misoprostol combination pack) for 1st trimester MTP (up to 63 days) at GMERS Dharpur, Patan, Gujarat, India. International Journal of Reproduction, Contraception, Obstetrics and Gynecology, 2018;7(9): 3615. https://doi.org/10.18203/2320-1770.ijrcog20183763

[3] Platais, I., Tsereteli, T., Grebennikova, G., Lotarevich, T., & Winikoff, B. (2016). Prospective study of home use of mifepristone and misoprostol for medical abortion up to 10weeks of pregnancy in Kazakhstan. International journal of gynaecology and obstetrics: the official organ of the International Federation of Gynaecology and Obstetrics, 2016;134(3): 268–271. येथून मिळवले: https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/?term=Prospective+study+of+home+use+of+mifepristone+and+misoprostol+for+medical+abortion+up+to+10+weeks+of+pregnancy+in+Kazakhstan

[4] Raymond, E. G., Harrison, M. S., & Weaver, M. A. (2019). Efficacy of Misoprostol Alone for First-Trimester Medical Abortion: A Systematic Review – Gynuity Health Projects. Gynuity. येथून मिळवले: https://gynuity.org/resources/efficacy-of-misoprostol-alone-for-first-trimester-medical-abortion-a-systematic-review

[5] CiplaMed. (2013). MTP Kit (Mifepristone + Misoprostol). येथून मिळवले: https://www.ciplamed.com/content/mtp-kit

Last updated on 11/02/2021