गर्भपातासाठी RU486: आपल्याला काय माहीत असला हवे

बाजारामध्ये अनेक प्रकारच्या विविध गर्भपाताच्या गोळ्या आहेत आणि त्यांची उपलब्धता जगभरात वेगळी आहे. या गोळ्यांमधील सर्वसामान्य गोळी RU486 (मिफेप्रिस्टोन) आहे. RU486 कसे काम करते, तिची किंमत काय आहे, डोस काय आहे, ती कुठे मिळेल याबद्दल आपण जाणू इच्छित असल्यास, ही मार्गदर्शिका उपयुक्त ठरेल अशी आम्ही आशा करतो. आपल्याला अतिरिक्त प्रश्न असल्यास, कृपया आमच्या समुपदेशकांशी संपर्क साधा आणि आम्ही आपल्याला नक्कीच समर्थन देऊ.

RU486 गर्भपाताची गोळी काय आहे?

RU486 (याला मिफेप्रिस्टोन देखील म्हणतात) ही 11 आठवड्यांपर्यंतच्या गर्भधारणांच्या गर्भपातासाठी वापरण्यात येणारी गोळी आहे. RU486 गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या गर्भधारणा हॉर्मोनला रोखते. RU486 ही जगभरातील अनेक औषधोत्पादन कंपनींद्वारे उत्पादित केली जाते आणि अनेक वेगवेगळ्या नावांनी विकली जाते (उदाहरणार्थ मिफेजीन आणि मिफेप्रेक्स. [1]

RU486 गर्भपातासाठी कसे काम करते?

RU486 प्रोजेस्टेरॉनचा परिणाम रोखते, जो गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक असलेला एक नैसर्गिक गर्भधारणा हॉर्मोन आहे. यामुळे गर्भाची वाढ थांबते आणि हे गर्भाशयाला आकुंचण्यासाठी आणि गर्भाशय ग्रीवेला मऊ होऊन रुंद होण्यासाठी तयार करते. साधारणपणे, हे वापराच्या 24- 48 तासांमध्ये काम करणे सुरू करेल.

गर्भपातासाठी, RU486 हे एका प्रोस्टाग्लॅंडिन औषधासोबत (जसे मिसोप्रोस्टॉल, सायटोटेक, मिसोट्रोल) घेण्यासाठी बनलेले आहे, जे गर्भाशय ग्रीवेला मऊ होऊन पसरण्यात आणि गर्भाशयाला आकुंचीत होण्यात मदत करेल. [1], [2]

RU486 चा डोस

RU486 हे 200mg च्या गोळ्यांच्या स्वरुपात येते जो 11 आठवड्यांखालील कोणत्याही गर्भधारणेसाठी शिफारस करण्यात येणारा डोस आहे. ती तोंडावाटे गिळली पाहिजे. RU486 वापरल्यावर 24-48 तास थांबून, त्यानंतर प्रोस्टाग्लॅंडिन औषध (जसे मिसोप्रोस्टॉल, सायटोटेक, मिसोट्रोल) घ्यावे. [1], [2]

गर्भाच्या वयाच्या आधारावर प्रोस्टाग्लॅंडिन औषधाचा शिफारस करण्यात येणारा डोस बदलतो, अधिक माहितीसाठी शिफारस करण्यात येणारा प्रोटोकॉल येथे पहा.

9 आठवड्यांहून कमी गर्भधारणा असणार्‍या महिलांसाठी RU486 आणि मिसोप्रोस्टॉलचा डोस: आपल्याला RU486 ची 1 आणि मिसोप्रोस्टॉलच्या 4 गोळ्यांची आवश्यकता असेल आणि मिसोप्रोस्टॉलच्या अतिरिक्त 4 गोळ्या (मिसोप्रोस्टॉलच्या एकूण 8 गोळ्या) घेण्याची शिफारस केली जाते.

9- 11 आठवड्यांमधील गर्भधारणा असणार्‍या महिलांसाठी RU486 आणि मिसोप्रोस्टॉलचा डोस: आपल्याला RU486 ची 1 आणि मिसोप्रोस्टॉलच्या किमान 4 गोळ्यांची आवश्यकता असेल, परंतु आपण 9- 11 आठवड्यांदरम्यान गर्भवती असल्यामुळे मिसोप्रोस्टॉलच्या अतिरिक्त 4 गोळ्या घेण्याची तीव्र शिफारस केली जाते (मिसोप्रोस्टॉलच्या एकूण 8 गोळ्या). 8 गोळ्या मिळवणे कठीण असल्यास, आपण मिसोप्रोस्टॉलच्या केवळ 4 गोळ्या घेऊ शकता, पण त्यांचा प्रभाव कमी होईल.

RU486 ची किंमत

RU486 ची किंमत भौगोलिक स्थानानुसार बदलेल. वेगवेगळ्या देशांमध्ये गर्भपाताचे वेगवेगळे नियम असतात आणि यामुळे RU486 च्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो.

अशा संस्था आहेत ज्या दान म्हणून गोळ्या पाठवू शकतात, आपण RU486 मिळवण्याबद्दल अधिक माहितीसाठी Women on Web आणि Women Help Women तपासू शकता. [4]

RU486 कशी घ्यावी

safe2choose RU486 ची एक गोळी (200mg) पाण्याबरोबर घेण्याची शिफारस करते. आपण RU486 गोळी घेतल्यानंतर पहिल्या 30 मिनिटांमध्ये उल्टी केल्यास, असे होऊ शकते की गोळी काम करणार नाही आणि आपल्याला अजून एक RU486 गोळी घ्यावी लागेल.

RU486 गोळी घेतल्यानंतर 24-48 तास थांबा आणि नंतर प्रोस्टाग्लॅंडिनचा शिफारस केलेला डोस घ्या.

गर्भाच्या वयाच्या आधारावर प्रोस्टाग्लॅंडिन औषधाच्या सूचना आणि डोस बदलतात, तपशील आणि प्रोटोकॉल येथे मिळेल.

RU486 चे साइड इफेक्ट

RU486 गर्भधारणेशी संबंधित मळमळ काही प्रमाणात वाढवू शकते आणि हे शक्य आहे की त्यामुळे पोटात कळा येऊ शकतील किंवा रक्तस्त्राव होऊ शकेल. साधारणपणे, RU486 गोळीसह प्रोस्टाग्लॅंडिन औषध घेतल्यानंतरच पोटदुखी आणि रक्तस्त्राव होईल.

RU486 गर्भपाताच्या गोळ्या कशा दिसतात?

RU486 ही जगभरातील अनेक औषधोत्पादन कंपनींद्वारे बनवली जाते आणि त्यामुळे RU486 वेगवेगळ्या आकार आणि साइजमध्ये मिळू शकते. ती नेहमी 200 mg ची गोळी असते.

RU486 गर्भपाताच्या गोळ्या कशा मिळवाव्यात

भौगोलिक स्थान आणि संबंधित गर्भपात कायदे किंवा निर्बंधांनुसार RU486 गर्भपाताच्या गोळ्यांची उपलब्धता बदलते.

ही वेबसाइट आपल्या स्थानामध्ये RU486 ची उपलब्धता जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकते [4] किंवा आपण आमच्या समुपदेशकांना संपर्क करू शकता आणि ते आपल्याला आपल्या जवळपास असलेला एक विश्वसनीय प्रदाता शोधण्यास मदत करतील.

लेखक:

by the safe2choose टीम आणि कॅराफेम मधील समर्थन देणार्‍या तज्ञांद्वारे, द नॅशनल अबॉर्शन फंड (NAF) यांच्या 2020 च्या शिफारसी आणि Ipas च्या 2019 च्या शिफारसींवर आधारित.

द नॅशनल अबॉर्शन फंड (NAF) ही उत्तर अमेरिकेतील गर्भपात सुविधा पुरवणार्‍या प्रदात्यांची व्यावसायिक संस्था आहे.

कॅराफेम एक सोयिस्कर आणि व्यावसायिक गर्भपात आणि कुटुंब नियोजन सेवा प्रदान करते ज्यामुळे लोक त्यांच्या मुलांची संख्या आणि त्यांच्यामधील अंतर नियंत्रित करू शकतात.

Ipas ही एकमेक अंतरराष्ट्रीय संस्था आहे जिचा एकमेव हेतु सुरक्षित गर्भपात आणि गर्भनिरोधक देखभालीची उपलब्धता वाढवणे आहे


स्त्रोत

[1] Gynuity. कमी साधने असलेल्या सेटिंगमध्ये मेडिकल गर्भपात करणे एक प्रास्ताविक मार्गदर्शिका. दुसरी आवृत्ती. 2009. येथून मिळवली: https://gynuity.org/assets/resources/clinguide_maguide2nd_edition_en.pdf

[2] वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइझेशन (WHO). सुरक्षित गर्भपात: स्वास्थ्य प्रणाल्यांसाठी तांत्रिक आणि धोरण मार्गदर्शक, दुसरी आवृत्ती. 2012. येथून मिळवली: https://apps.who.int/iris/bitstream/handle/10665/70914/9789241548434_eng.pdf;jsessionid=F77B761669FC579124C1E9CA2CC3CFDB?sequence=1

[3] Ipas. (2019). पुनरुत्पादात्मक आरोग्यामधील क्लिनिकल अद्यतने. L. Castleman & N. Kapp (Eds.). Chapel Hill, NC: Ipas. येथून मिळवली: https://ipas.azureedge.net/files/CURHE19-april-ClinicalUpdatesInReproductiveHealth.pdf

[4] विमेन ऑन वेव्स. नकाशावरील देश. येथून मिळवली: https://www.womenonwaves.org/en/map/country

Last updated on 11/02/2021