गर्भपातासाठी मिसोट्रोल: आपल्याला काय माहीत असायला हवे

बाजारामध्ये अनेक प्रकारच्या विविध गर्भपाताच्या गोळ्या आहेत आणि त्यांची उपलब्धता जगभरात वेगळी आहे. या गोळ्यांमधील सर्वसामान्य गोळी मिसोट्रोल आहे. मिसोट्रोल कसे काम करते, तिची किंमत काय आहे, डोस काय आहे, ती कुठे मिळेल याबद्दल आपण जाणू इच्छित असल्यास, ही मार्गदर्शिका उपयुक्त ठरेल अशी आम्ही आशा करतो. आपल्याला अतिरिक्त प्रश्न असल्यास, कृपया आमच्या समुपदेशकांशी संपर्क साधा आणि आम्ही आपल्याला नक्कीच समर्थन देऊ.

मिसोट्रोल गर्भपाताची गोळी काय आहे?

मिसोट्रोल ही 11 आठवड्यांपर्यंतच्या गर्भधारणांच्या गर्भपातासाठी वापरण्यात येणारी गोळी आहे. हे एक प्रोस्टाग्लांडीन औषध आहे, याचाच अर्थ गर्भधारणेदरम्यान वापरल्यावर यामुळे गर्भाशयग्रीवा मऊ होते आणि मोठी होते आणि गर्भाशयाचे आकुंचन होते. हे Pfizer औषधोत्पादन कंपनीद्वारे उत्पादित केले जाते. [1]

मिसोट्रोल गर्भपातासाठी कसे काम करते?

मिसोट्रोल गर्भाशयग्रीवा मऊ आणि मोठी करून काम करते आणि गर्भाशयाचे आकुंचन करते. या क्रियांमुळे गर्भ बाहेर पडायला मदत होते. सामान्यतः ही वापरल्यावर ~1 तासामध्ये परिणाम करायला लागते, पण याला वेळ सुद्धा लागू शकतो.[2]

मिसोट्रोलचा डोस

सामान्यतः मिसोट्रोल 200mcg च्या गोळ्यांमध्ये मिळते आणि गर्भधारणा किती वाढली आहे यावर तिच्या डोसची शिफारस बदलते.

9 आठवड्यांहून कमी काळाच्या गर्भधारणेसाठी, शिफारस केलेला मिसोट्रोलचा डोस आहे 800mcg चे 2 सेट (एकूण 1600mcg किंवा 8 गोळ्या).

9-11 आठवड्यांमधील गर्भधारणेसाठी, शिफारस केलेला मिसोट्रोलचा उपलब्ध डोस आहे 800mcg चे 3 सेट (एकूण 2400mcg किंवा 12 गोळ्या). [1]

केवळ मिसोट्रोल वापरुन गोळ्यांद्वारे गर्भपात करण्याच्या प्रोटोकॉलबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, या पृष्ठा ला भेट द्या.

6 आठवड्यांखालील गर्भधारणेसाठी मिसोट्रोलचा डोस किती आहे?

6 आठवडे किंवा त्याहून कमी काळाच्या गर्भधारणेसाठी, शिफारस केलेला मिसोट्रोलचा डोस आहे 800mcg चे 2 सेट (एकूण 1600mcg किंवा 8 गोळ्या). काही केसेसमध्ये वापरासाठी 800mcg (4 गोळ्यांचा) अतिरिक्त सेट ठेवण्याची सुद्धा शिफारस केली जाते. [1]

9 आठवड्यांखालील गर्भधारणेसाठी मिसोट्रोलचा डोस किती आहे?

9 आठवड्यांहून कमी काळाच्या गर्भधारणेसाठी, शिफारस केलेला मिसोट्रोलचा डोस आहे 800mcg चे 2 सेट (एकूण 1600mcg किंवा 8 गोळ्या). काही केसेसमध्ये वापरासाठी 800mcg (4 गोळ्यांचा) अतिरिक्त सेट ठेवण्याची सुद्धा शिफारस केली जाते. [1]

9 ते 11 आठवड्यांमधील गर्भधारणेसाठी मिसोट्रोलचा डोस किती आहे?

9 ते 11 आठवड्यांमधील गर्भधारणेसाठी, शिफारस केलेला मिसोट्रोलचा उपलब्ध डोस आहे 800mcg चे 3 सेट (एकूण 2400mcg किंवा 12 गोळ्या). [1]

मिसोट्रोलची किंमत

मिसोट्रोलची किंमत बरेचदा खूप कमी असते पण भौगोलिक स्थानानुसार ती बदलत जाईल. वेगवेगळ्या देशांमध्ये गर्भपाताचे वेगवेगळे नियम असतात आणि यामुळे मिसोट्रोलच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो. असे शक्य आहे की गर्भपातावर कायदेशीर निर्बंध असणार्‍या देशांमध्ये प्रिस्क्रिप्शनशिवाय मिसोट्रोलची किंमत महाग असू शकते.

अशा संस्था आहेत ज्या दान म्हणून गोळ्या पाठवू शकतात, आपण गोळ्या मिळवण्याबद्दल अधिक माहितीसाठी Women on Web आणि Women Help Women तपासू शकता. [5]

मिसोट्रोल कशी घ्यावी

safe2choose मिसोट्रोलला जिभेखाली ठेऊन (किंवा सबलिंगुअलपद्धतीने) घ्यायची शिफारस करते. हे घेण्याची सर्वात उत्तम पद्धत आहे मिसोट्रोलच्या 4 गोळ्या (प्रत्येक 200mcg) थेट जिभेखाली ठेवाव्या (सबलिंगुअलपद्धतीने) आणि त्यांना तिथे 30 मिनिटे विरघळू द्यावे. 30 मिनिटांनंतर उरलेल्या गोळ्या पाणी पिऊन पाण्यासह गिळल्या जाऊ शकतात.

मिसोट्रोलचा पहिला डोस (800mcg) घेतल्यानंतर 3 तासांनी तशाच प्रकारे पुढचा डोस घ्यावा. प्रोटोकॉल मध्ये तिसरा डोस दर्शवला असल्यास, तो दुसर्‍या डोस नंतर 3 तासांनी घ्यावा. [1]

मिसोट्रोलचे साइड इफेक्ट

गर्भपातासाठी वापरल्यावर, मिसोट्रोलचे अपेक्षित परिणाम आहेत पोटामध्ये वेदना आणि रक्तस्त्राव होणे. या परिणामांसह, मळमळ, उल्टी, जुलाब, ताप आणि थंडी असे साइड इफेक्ट जाणवू शकतात.

सामान्यतः हे परिणाम 24 तासांपूर्ते मर्यादित असतात. [3]

मिसोट्रोल गर्भपाताच्या गोळ्या कशा दिसतात?

मिसोट्रोल 200mcg टॅबलेट या लहान, पांढर्‍या, षटकोनी आकाराच्या गोळ्या असतात. त्यांना मधून भेग असते आणि त्यांच्यावर “searle” आणि/किंवा “1461” कोरलेले असते. [4]

मिसोट्रोल गर्भपाताच्या गोळ्या कशा मिळवाव्यात?

मिसोट्रोल गर्भपाताच्या गोळ्यांची उपलब्धता भौगोलिक स्थानाच्या आधारावर बदलत असते. मिसोट्रोल पोटाच्या अल्सरसाठी सुद्धा दिली जाते, त्यामुळे काहीवेळा ती दुकानामध्ये प्रिस्क्रिप्शनशिवाय देखील मिळू शकते. तसे असल्यास, मिसोट्रोल आपल्या स्थानिक फार्मसीमध्ये पोटाच्या औषधांजवळ मिळू शकते. ते तिथे न सापडल्यास, अशी शक्यता आहे की तिला फार्मसीमधून घेण्यासाठी प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता आहे.

ही वेबसाइट आपल्या स्थानामध्ये मिसोट्रोलची उपलब्धता जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकते [5] किंवा आपण आमच्या समुपदेशकांशी संपर्क करू शकता आणि ते आपल्याला आपल्या जवळपास असलेला एक विश्वसनीय प्रदाता शोधण्यास मदत करतील.

लेखक:

by the safe2choose टीम आणि कॅराफेम मधील समर्थन देणार्‍या तज्ञांद्वारे, द नॅशनल अबॉर्शन फंड (NAF) यांच्या 2020 च्या शिफारसी आणि Ipas च्या 2019 च्या शिफारसींवर आधारित.

द नॅशनल अबॉर्शन फंड (NAF) ही उत्तर अमेरिकेतील गर्भपात सुविधा पुरवणार्‍या प्रदात्यांची व्यावसायिक संस्था आहे.

कॅराफेम एक सोयिस्कर आणि व्यावसायिक गर्भपात आणि कुटुंब नियोजन सेवा प्रदान करते ज्यामुळे लोक त्यांच्या मुलांची संख्या आणि त्यांच्यामधील अंतर नियंत्रित करू शकतात.

Ipas ही एकमेक अंतरराष्ट्रीय संस्था आहे जिचा एकमेव हेतु सुरक्षित गर्भपात आणि गर्भनिरोधक देखभालीची उपलब्धता वाढवणे आहे


स्त्रोत

[1] Ipas. (2019). पुनरुत्पादात्मक आरोग्यामधील क्लिनिकल अद्यतने. L. Castleman & N. Kapp (Eds.). Chapel Hill, NC: Ipas. येथून मिळवली: https://ipas.azureedge.net/files/CURHE19-april-ClinicalUpdatesInReproductiveHealth.pdf

[2] अपटुडेट. गर्भधारणेच्या वैद्यकीय समाप्तीसाठी एकच एजंट म्हणून मिसोप्रोस्टॉल. येथून मिळवली: https://www.uptodate.com/contents/misoprostol-as-a-single-agent-for-medical-termination-of-pregnancy?search=cytotec&source=search_result&selectedTitle=2~117&usage_type=default&display_rank=1#H2428459676

[3] Allen R, O’Brien BM. प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्रात मिसोट्रोलचा वापर. Rev Obstet Gynecol. 2009;2(3):159–168. येथून मिळवली: https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2760893/

[4] अपटुडेट. मिसोप्रोस्टॉल: औषधाची माहिती. येथून मिळवली: https://www.uptodate.com/contents/misoprostol-drug-information?search=cytotec&source=panel_search_result&selectedTitle=1~117&usage_type=panel&kp_tab=drug_general&display_rank=1#F197173

[5] विमेन ऑन वेव्स. नकाशावरील देश. येथून मिळवली: https://www.womenonwaves.org/en/map/country

Last updated on 11/02/2021