एका सुरक्षित मॅन्युअल वॅक्युम अस्पिरेशन गर्भपातासाठी मार्गदर्शक

मॅन्युअल वॅक्युम अस्पिरेशन गर्भपात (MVA) किंवा इलेक्ट्रिक वॅक्युम अस्पिरेशन गर्भपात (EVA) हे क्लिनिकमधील गर्भपाताचे प्रकार आहेत जे गर्भधारणेच्या 14 आठवडे (MVA) आणि 15 आठवड्यांपर्यंत (EVA) केले जाऊ शकतात. या पृष्ठामध्ये या गर्भपात प्रक्रियांबद्दल तपशीलवार माहिती दिलेली आहे.

मॅन्युअल वॅक्युम अस्पिरेशन (MVA) गर्भपात काय आहे?

मॅन्युअल वॅक्युम अस्पिरेशन (MVA) ही पहिल्या त्रैमासातील आणि/किंवा दुसर्‍या त्रैमासाच्या सुरुवातीपासून गर्भधारणेच्या 14 आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची एक खूप सुरक्षित पद्धत आहे [1]. MVA साठी गर्भधारणेच्या वयाची मर्यादा अनेकदा क्लिनिक तसेच प्रक्रिया करणार्‍या आरोग्यसेवा प्रदात्यावर अवलंबून असते.

MVA हे क्लिनिकमध्ये एका प्रशिक्षित प्रदात्याद्वारे केले जाते.

प्रक्रियेदरम्यान गर्भाशयातून गर्भ काढण्यासाठी क्लिनिशियन सायलंट सक्शन डिव्हाइससह इतर उपकरणे वापरतात [2]. सामान्यतः ही प्रक्रिया महिला जागी असताना लोकल एनेस्थीशिया देऊन करतात आणि याला साधारणपणे 5 ते 10 मिनिटे लागतात. महिलेला प्रक्रियेदरम्यान वेदना जाणवू शकतात आणि नंतर अधून मधून अनेक दिवस किंवा आठवडे काही रक्तस्त्राव होऊ शकतो.

MVA हे मॅन्युअल वॅक्युम अस्पिरेशन आहे पण याला सर्जिकल गर्भपात, अस्पिरेशन गर्भपात, सक्शन गर्भपात, वॅक्युम अस्पिरेशन प्रक्रिया गर्भपात किंवा क्लिनिकमधील गर्भपात देखील म्हणतात. [1]

इलेक्ट्रिक वॅक्युम अस्पिरेशन (EVA) गर्भपात काय आहे?

इलेक्ट्रिक वॅक्युम अस्पिरेशन (EVA) ही एक खूप सुरक्षित आणि मॅन्युअल वॅक्युम अस्पिरेशन (MVA) शी जुळणारी पद्धत आहे. EVA गर्भधारणेच्या पहिल्या त्रैमासिक काळात आणि/किंवा दुसर्‍या त्रैमासिक काळाच्या सुरूवातीला वापरली जाऊ शकते. EVA हे क्लिनिकमध्ये एका प्रशिक्षित प्रदात्याद्वारे केले जाते.

प्रक्रियेदरम्यान गर्भाशयातून गर्भ काढण्यासाठी क्लिनिशियन इलेक्ट्रिक वॅक्युम सक्शन डिव्हाइससह इतर उपकरणे वापरतात.

EVA आणि MVA मधील मुख्य फरक हा आहे की गर्भ काढण्यासाठी सक्शन म्हणून वीज वापरली जाते. EVA साठी वीज आवश्यक असल्याने, ती कदाचित कमी साधने असलेल्या ठिकाणी उपलब्ध असणार नाही. जिथे उपलब्ध असेल तिथे, 10-12 आठवड्यांनी गर्भाचे वय वाढत असल्यामुळे क्लिनिशियन ही EVA ची पद्धत वापरू शकतात कारण यामुळे त्यांना ही प्रक्रिया MVA पेक्षा जास्त जलद करता येते आणि त्यामुळे महिलेसाठी प्रक्रियेचा वेळ कमी होतो. अजून एक महत्त्वाचा फरक म्हणजे EVA यंत्र वीज वापरत असल्यामुळे त्याचा आवाज होतो. [2]

मॅन्युअल वॅक्युम अस्पिरेशन गर्भपात प्रक्रियेदरम्यान काय होते?

1/ वॅक्युम अस्पिरेशन गर्भपातापूर्वी घेण्याचे औषध

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशन (WHO) हे मॅन्युअल वॅक्युम अस्पिरेशन आणि इलेक्ट्रिक वॅक्युम अस्पिरेशन आधी अँटीबायोटीक देण्याची शिफारस करते. यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. [1]

पण, अँटीबायोटीक अनुपलब्ध असल्यास, वॅक्युम अस्पिरेशन गर्भपात तरीही सुरक्षितपणे केला जाऊ शकतो. कळा येण्यासारख्या वेदना कमी करण्यासाठी क्लिनिक तोंडी घेण्याचे औषध देऊ शकते जसे इबुप्रोफेन. [2]

2/ वॅक्युम अस्पिरेशन गर्भपात करण्यासाठी तयारी

प्रतिमा वॅक्युम-अस्पिरेशन-करण्या-आधीच्या-चाचण्या

मॅन्युअल वॅक्युम अस्पिरेशन गर्भपात (MVA) किंवा इलेक्ट्रिक वॅक्युम अस्पिरेशन गर्भपात (EVA), करण्याच्या क्लिनिक भेटीदरम्यान प्रक्रियेच्या तयारीसाठी अनेक पाऊले उचलली जातात ज्यात सामील असू शकतात (पण मर्यादित नाही) [2]:

  1. मूत्र गर्भधारणा चाचणी
  2. Rh रक्त गटाची चाचणी
  3. गर्भाचे वय जाणून घेण्यासाठी मॅन्युअल पेल्विक परीक्षण आणि/किंवा अल्ट्रासाऊंड
  4. रक्तदाब मोजणे

प्रत्येक भौगोलिक स्थानासाठी विशेष आवश्यक/कायद्यानुसार बांधील काही अतिरिक्त चाचण्या केल्या जाऊ शकतात.

3/ मॅन्युअल वॅक्युम अस्पिरेशन गर्भपाता दरम्यान

चरण 1. मॅन्युअल वॅक्युम अस्पिरेशन गर्भपात (MVA) किंवा इलेक्ट्रिक वॅक्युम अस्पिरेशन गर्भपात (EVA) प्रक्रिया पेल्विक किंवा स्पेक्युलम परीक्षणाने सुरू होते.

चरण 2. लोकल एनेस्थीशिया साधारणपणे गर्भाशय ग्रीवेच्या बाजूला इंजेक्ट केले जाते.

चरण 3. त्यानंतर क्लिनिशियन सर्विकल डायलेटर नावाचे साधन वापरुन गर्भाशय ग्रीवेला मोठी करण्यास सुरुवात करतील. हे डायलेटर हळू हळू आकाराने वाढतात आणि हे चरण गर्भधारणा किती पुढे गेली आहे त्या आठवड्यांच्या संख्येवर आधारित असते.

चरण 4. एकदा अपेक्षित रुंदी गाठल्यावर, क्लिनिशियन एकतर MVA साठी एक मूक, हातात पकडण्याचे सक्शन उपकरण वापरेल ज्याला Ipas म्हणतात, किंवा अस्पिरेशन करून गर्भ बाहेर काढण्यासाठी EVA साठी इलेक्ट्रिक उपकरण वापरेल.

चरण 5. गर्भ काढल्यावर, प्रदाता अल्ट्रासाऊंड करण्याचे निवडू शकतो आणि त्यानंतर महिलेला आराम करण्यास दिला जातो. [2]

प्रतिमा वॅक्युम-अस्पिरेशन-गर्भपात-क्रमा-क्रमाने

4/ मॅन्युअल वॅक्युम अस्पिरेशन गर्भपातानंतर

मॅन्युअल वॅक्युम अस्पिरेशन गर्भपात (MVA) किंवा इलेक्ट्रॉनिक वॅक्युम अस्पिरेशन गर्भपात (EVA) मधून बरे होण्याचा काळ क्लिनिकमध्ये कमी असतो.

  • केवळ लोकल एनेस्थेटीक वापरुन प्रक्रिया करणार्‍या महिलांसाठी, बरे होण्याचा काळ साधारणपणे 30 मिनिटांपेक्षा कमी असतो.
  • ज्या महिलांना प्रक्रियेसाठी उपशामक औषध देण्यात आले होते, त्यांच्यासाठी बरे होण्याचा वेळ उपशामक औषधांचा प्रभाव कमी होईपर्यंत थोडा जास्त असू शकतो (30-60 मिनिटे).

क्लिनिकमधील गर्भपात केल्यानंतर बरे झाल्यावर, महिलेला घरी पाठवले जाते. काही क्लिनिक तिला घरी पोहोचवणारे कोणीतरी किंवा कोणीतरी सोबत असावी अशी विनंती करू शकतात, पण हे क्लिनिकवर अवलंबून आहे. [2]

5/ मॅन्युअल वॅक्युम अस्पिरेशन गर्भपातानंतर घेण्याची काळजी

एका सुरक्षित क्लिनिकमधील गर्भपातानंतर, महिलांना अनेकदा एक फॉलो-अप भेट देऊ केली जाते, आणि तिची गरज नसली तरीही, प्रत्येक महिलेने तिच्या आरोग्य सेवा प्रदात्याच्या शिफारसीचा विचार करावा.

विशिष्ट कार्ये करण्यासाठी महिलेने थांबावे अशी वैद्यकीयरित्या सिद्धा झालेली कोणतीही वेळमर्यादा नाही जसे शॉवर/आंघोळ समवेत व्यायाम, शारीरिक संबंध किंवा टॅम्पॉन वापरण्यासाठी. साधारणपणे प्रक्रियेनंतर किमान रक्तस्त्राव कमी होईपर्यंत महिलेने,आपल्या योनीमध्ये टॅम्पॉन आणि मेन्स्टृअल कप सारख्या गोष्टी घालणे आणि तीव्र शारीरिक क्रियाकलाप करणे टाळावे अशी शिफारस केली जाते. प्रत्येक महिला सहन होईल त्याप्रमाणे तिचे नित्य क्रियाकलाप करणे पुन्हा सुरू करू शकते आणि प्रत्येक महिला वेगळी असेल.

क्लिनिकमधून निघण्याआधी, महिलांना गर्भनिरोधक पद्धतींबद्दल माहिती दिली पाहिजे. गर्भनिरोधनाचे बरेच प्रकार लगेच सुरू केले जाऊ शकतात, परंतु, प्रत्येक महिला आणि तिच्या निवडीच्या पद्धतीबद्दल चर्चा झाली पाहिजे. गर्भपातानंतर महिलांना प्रश्न किंवा समस्या असू शकतात त्यामुळे क्लिनिकनी त्यांना संपर्क माहिती पुरवावी. [2]

आपल्या निवडीची योग्य गर्भनिरोधक पद्धत निवडण्यासाठी, www.mazipaddhatshodha.org ला भेट द्या

प्रक्रियेदरम्यान वापरण्यात येणारे मॅन्युअल वॅक्युम अस्पिरेशन (MVA) साधन

मॅन्युअल वॅक्युम अस्पिरेशन (MVA) मध्ये एका सोयिस्कर, हातात पकडून वापरण्याच्या साधनाचा उपयोग होतो ज्याला Ipas असे म्हणतात. Ipas एक शांत, सक्शन उपकरण आहे ज्याला गर्भ अस्पिरेट करण्यासाठी वापरले जाते. [2] Ipas उपकरण याबद्दल अधिक माहिती येथे मिळू शकते.

Ipas equipment manual vacuum aspiration abortion mva

प्रक्रियेदरम्यान वापरण्यात येणारे इलेक्ट्रिक वॅक्युम अस्पिरेशन (EVA) साधन

इलेक्ट्रिक वॅक्युम अस्पिरेशन (EVA) एका सक्शन निर्माण करणार्‍या यंत्राचा वापर करते, जे एका ट्यूबसह जोडलेले असते जी क्लिनिशियन गर्भ अस्पिरेट करण्यासाठी गर्भाशय ग्रीवेमधून आत सोडतात. EVA उपकरण अस्पिरेशन करताना अनेकदा गुंजणारा/घुमणारा आवाज करते.

वॅक्युम अस्पिरेशन गर्भपातांचे बहुतेक पाहिले जाणारे साइड इफेक्ट

वॅक्युम अस्पिरेशन गर्भपातांसह जोडलेली सर्वात सामान्य वेदना आहे प्रक्रियेदरम्यान महिलेला जाणवणार्‍या तीव्र कळा. अनेकदा या कळा नंतर त्वरित कमी होतात, पण काही महिलांना काही दिवस किंवा आठवडे अधूनमधून कळा येऊ शकतात. हा साइड इफेक्ट इबुप्रोफेनसारख्या NSAID औषधाने सर्वोत्तम प्रकारे घालवला जाऊ शकतो.

वॅक्युम अस्पिरेशन गर्भपातांदरम्यान अनेकदा लोकल एनेस्थीशिया वापरला जातो आणि यामुळे प्रक्रियेदरम्यान गर्भाशय ग्रीवेच्या आजूबाजूचा भाग संवेदनाशून्य होऊन वेदना काही प्रमाणात कमी होतात. [1]

बहुतेक महिलांना वॅक्युम अस्पिरेशन गर्भपातांदरम्यान आणि नंतर रक्तस्त्राव आणि पोटदुखी होईल, प्रक्रियेनंतरच्या दिवसांमध्ये ही लक्षणे हळू हळू कमी होतील.

क्लिनिकमधील गर्भपातानंतर, अनेक प्रकारच्या भावना निर्माण होणे सामान्य आहे आणि ते योग्य आहे आणि जर महिलेला असे वाटत असेल की तिला अतिरिक्त मदतीची गरज आहे तर तिने समुपदेशन सेवा शोधली पाहिजे. [1]

वॅक्युम अस्पिरेशन गर्भपातां मध्ये गंभीर परिस्थिति उद्भवण्याचे धोके

वॅक्युम अस्पिरेशन गर्भपात खूप सुरक्षित असले तरीही, या प्रक्रियेमध्ये काही धोके देखील आहेत ज्यामध्ये समाविष्ट आहेत: अति रक्तस्त्राव, संसर्ग, गर्भाशय आणि आजूबाजूच्या भागास इजा, अपूर्ण गर्भपात

जेव्हा प्रक्रिया एका प्रशिक्षित क्लिनिशियन द्वारे केली जाते तेव्हा हे धोके खूप कमी प्रमाणात असतात, पण प्रक्रियेसाठी संमती देत असताना ते माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे.

एक सामान्य, गंभीर परिस्थिति न उद्भवलेली वॅक्युम अस्पिरेशन गर्भपात प्रक्रिया भविष्यात नपुंसकता निर्माण करत नाही. [1]

वॅक्युम अस्पिरेशन गर्भपात झाल्यानंतर, काही लक्षणे आहेत ज्याकडे महिलेने लक्ष दिले पाहिजे आणि असे असल्यास वैद्यकीय सहाय्य घेतले पाहिजे [2]:

  • अति रक्तस्त्राव (सलग 2 किंवा अधिक तास, दर तासाला 2 पॅड संपूर्णपणे भिजत असतील)
  • प्रक्रियेनंतर 24 तासांपेक्षा जास्त काळ ताप (38C किंवा 100.4F पेक्षा अधिक) येत असेल
  • वाढत जाणार्‍या तीव्र ओटीपोटाच्या वेदना
  • गर्भधारणेची लक्षणे कायम राहणे (वाढती मळमळ, स्तन नाजुक होणे, इत्यादि)

अधिक माहितीसाठी

MVA किंवा EVA सारख्या क्लिनिकमधील गर्भपात प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि आपल्या परिस्थितिवर आधारित सर्वात योग्य गर्भपात प्रक्रियेबाबत समर्थन मिळवण्यासाठी आमच्या समुपदेशकांशी संपर्क साधा. आपण 11 आठवड्यांपेक्षा कमी काळ गर्भवती असल्यास, आपण अन्य पद्धतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता, जसे गोळ्यांद्वारे केला जाणारा गर्भपात.

लेखक:

safe2choose टीम आणि कॅराफेम मधील समर्थन देणार्‍या तज्ञांद्वारे, Ipas यांच्या 2019 च्या शिफारसी आणि WHO च्या 2012 च्या शिफारसींवर आधारित.

कॅराफेम एक सोयिस्कर आणि व्यावसायिक गर्भपात आणि कुटुंब नियोजन सेवा प्रदान करते ज्यामुळे लोक त्यांच्या मुलांची संख्या आणि त्यांच्यामधील अंतर नियंत्रित करू शकतात.

Ipas ही एकमेव अंतरराष्ट्रीय संस्था आहे जिचा एकमेव हेतु सुरक्षित गर्भपात आणि गर्भनिरोधक देखभालीची उपलब्धता वाढवणे आहे.

WHO ही संयुक्त राष्ट्रांची एक विशिष्ट एजन्सि आहे जी जागतिक सार्वजनिक आरोग्यासाठी जबाबदार आहे.


स्त्रोत

[1] वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइझेशन (WHO). सुरक्षित गर्भपात: स्वास्थ्य प्रणाल्यांसाठी तांत्रिक आणि धोरण मार्गदर्शक, दुसरी आवृत्ती. 2012. येथून मिळवली: https://apps.who.int/iris/bitstream/handle/10665/70914/9789241548434_eng.pdf;jsessionid=F77B761669FC579124C1E9CA2CC3CFDB?sequence=1

[2] Ipas. पुनरुत्पादात्मक आरोग्यामधील क्लिनिकल अद्यतने. 2019. येथून मिळवली: https://ipas.azureedge.net/files/CURHE19-april-ClinicalUpdatesInReproductiveHealth.pdf

Last updated on 10/02/2021