गोपनीयता धोरण

1. पार्श्वभूमी

डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.safe2choose.ओआरजी (www.safe2choose.org) ही वेबसाइट आणि संबंधित समुपदेशन सेवा (“वेबसाइट”) या मेडिकल गर्भपाताचा विचार करणार्‍या महिलांना विनामूल्य पुरवण्यात येणारी सेवा आहे.

ही कंपनी आमच्या वेबसाइटला भेट देणार्‍या प्रत्येकाच्या गोपनीयतेला समजून घेते आणि तिचा आदर करते आणि केवळ अशा मार्गांनी माहिती संकलित करेल आणि वापरेल जे आपल्यासाठी उपयुक्त असतील आणि एका प्रकारे आपल्या हक्कांशी आणि कंपनी, वेबसाइट आणि समुपदेशन सेवांना लागू असलेल्या कायद्यांअंतर्गत आमच्या असलेल्या बांधिलकीशी सुसंगत असतील.

हे धोरण आपल्या आमच्या वेबसाइटच्या वापराशी संबंधित असलेल्या अशा कोणत्याही आणि सर्व डेटाला लागू होते जो आम्ही संकलित करतो. कृपया हे गोपनीयता धोरण लक्षपूर्वक वाचा आणि आपल्याला ते समजले असल्याचे सुनिश्चित करा. आपली आमच्या गोपीयता धोरणाची स्वीकृती आपल्या आमच्या वेबसाइटच्या पहिल्या वापरादरम्यान आली पाहिजे. आपण या गोपनीयता धोरणाशी सहमत नसल्यास, आपण आमची वेबसाइट वापरणे ताबडतोब बंद केले पाहिजे.

हे गोपनीयता धोरण यूरोपियन यूनियन जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशननी भारतीय प्रजासत्ताकात आरोग्य आणि इतर संवेदनशील वैयक्तिक माहितीसाठी प्रस्तुत केलेल्या डेटा संरक्षण मार्गदर्शकतत्त्वांशी सुसंगत आहे.

येथे परिभाषित न केलेल्या शर्तींचे अर्थ सेवा शर्ती मध्ये नियुक्त केल्याप्रमाणे असतील.

2. या धोरणामध्ये समाविष्ट आहे

हे धोरण केवळ आपला आमच्या वेबसाइटचा वापर आणि आपल्या वैयक्तिक माहितीचे संकलन, संग्रह, वापर आणि प्रक्रिया यावर लागू होते. ती आमच्या वेबसाइटसह लिंक असलेल्या कोणत्याही वेबसाइटला विस्तारीत होत नाही (आम्ही त्या लिंक दिल्या असल्या किंवा इतर वापरकर्त्यांनी त्या सामायिक केल्या असल्या तरी). इतर वेबसाइटद्वारे आपला डेटा कसा संकलित केला जातो, संग्रहीत केला जातो किंवा वापरला जातो यावर आमचे काहीही नियंत्रण नाही आणि आम्ही आपल्याला अशा कोणत्याही वेबसाइटना डेटा देण्यापूर्वी त्यांची गोपनीयता धोरणे तपासण्याची शिफारस करतो.

3. आम्ही संकलित करत असलेला डेटा

काही डेटा आमच्या वेबसाइटद्वारे स्वयंचलितपणे संकलित केला जातो, इतर डेटा केवळ तेव्हा संकलित केला जातो जेव्हा आपण आम्हाला स्वखुशीने तो देता आणि आम्ही आमच्या नियुक्त केलेल्या समुपदेशकांसह आणि पॅनलमधील प्रॅक्टिशनर आणि डॉक्टरसह ऑनलाइन चॅट आणि समुपदेशन उद्देश्यांसाठी तो वापरण्यास संमती देता.

आपल्याला वैयक्तिकरित्या ओळखण्यासाठी वापरल्या जाऊ शकणार्‍या माहितीचे संकलन मर्यादित करून आम्ही अनामिक समुपदेशन सेवा देण्यास झटतो. आमचे ऑनलाइन लाइव्ह सेशन चॅट आपल्याला अनामिक करून हे साध्य करत असले तरीही, ईमेलद्वारे समुपदेशन सेवा अॅक्सेस करण्यासाठी आपला ईमेल-पत्ता आणि आपण स्वतः प्रदान केलेल्या इतर वैयक्तिक माहितीचे संकलन आणि संग्रह आवश्यक असेल.

आपल्या आमच्या वेबसाइटच्या वापरावर आधारित, आम्ही खालीलपैकी काही किंवा सर्व माहिती संकलित करू शकतो:

जो स्वयंचलितपणे संकलित केला जाऊ शकतो

 1. IP पत्ता (स्वयंचलितपणे संकलित)
 2. वेब ब्राउजर प्रकार आणि आवृत्ती (स्वयंचलितपणे संकलित)
 3. ऑपरेटिंग सिस्टिम (स्वयंचलितपणे संकलित)
 4. शिफारस करणार्‍या वेबसाइटने सुरू होणार्‍या, आमच्या वेबसाइट वरील आपला क्रियाकलाप(स्वयंचलितपणे संकलित केलेले)

“ऑनलाइन चॅट आणि समुपदेशन सेवा” मधून, आम्ही खालील डेटा संकलित करतो

– आम्ही कोणता वैयक्तिक डेटा मागतो?

 1. नाव, ईमेल आणि संपर्क माहिती केवळ फॉलो-अप समुपदेशन सेशन आवश्यक असल्यास.
 2. मेडिकल इतिहास
 3. महत्त्वाचे रेकॉर्ड
 4. देश, राज्य, शहर आणि वय (लवकरच येत आहे)

– आम्हाला आपला खाजगी डेटा का हवा असतो?

 • ऑनलाइन समुपदेशन सेवा देण्यासाठी किंवा आम्ही अधीन असलेल्या कोणत्याही वैधानिक जबाबदार्‍या पूर्ण करण्यासाठी.

– आपण आपली परवानगी मागे घेऊ शकता का?

 • होय. कोणत्याही वेळी गोपनीयता privacy@safe2choose.org येथे ईमेल पाठवून

4. आम्ही आपला डेटा कसा वापरतो?

1. आम्ही शक्य असेल तेवढे वैयक्तिक ओळख उघड करणार्‍या माहितीचे संकलन मर्यादित करतो जसे नाव, ईमेल-पत्ता, संपर्क माहिती, इत्यादि. परंतु, असा वैयक्तिक डेटा संकलित केल्यास, तो केवळ आपल्याला फॉलो-अप समुपदेशन सेशनसाठी संपर्क करण्यास, आमच्या सेवांबद्दल अभिप्राय घेण्यास किंवा आपल्या समुपदेशन सेशनबद्दल आपल्याला फॉलो-अप माहिती देण्यासाठी वापरला जातो. आम्ही आपली माहिती आमचे समुपदेशक, पॅनलमध्ये असलेले डॉक्टर आणि मेडिकल प्रॅक्टिशनर आणि आपल्याला समुपदेशन सेवा देण्यात सहाय्य करणारे आमचे संबंधित यांच्याव्यतिरिक्त कोणाशीही शेअर करत नाही आणि तेही केवळ आपल्याला समुपदेशन सेवा देण्यासाठी अशी माहिती आवश्यक असेल तरच. आम्ही आपली वैयक्तिक माहिती जसे नाव, ईमेल-पत्ता किंवा संपर्क माहिती आमच्या स्वतःच्या सेवांसाह इतर कोणत्याही साधने किंवा सेवांचा आपल्याला प्रचार करण्यासाठी वापरत नाही.

2. आपल्याद्वारे प्रदान केलेला किंवा आमच्याद्वारे संकलित केलेला सर्व डेटा वर नमूद केलेल्या कायदे आणि नियमांनुसार सुरक्षितपणे संग्रहीत केला जातो. आपला डेटा संग्रहीत करताना, आम्ही डेटामधून ओळख वेगळी करतो ज्यामुळे आपला आरोग्य डेटा किंवा चॅट-सेशनचे रेकॉर्ड किंवा ईमेल देवाणघेवाण हे आपले नाव, ईमेल-पत्ता किंवा इतर वैयक्तिक ओळख उघड करणारी माहिती यापासून वेगळे संग्रहीत होईल. आम्ही आपल्याला सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आपला डेटा वापरतो. यात समाविष्ट आहे:

 1. आमच्या वेबसाइटवर आपल्याला ऍक्सेस देणे आणि तिचे व्यवस्थापन करणे
 2. आमच्या वेबसाइटवर आपला अनुभव वैयक्तिकृत करणे आणि आपल्यासाठी खास करणे
 3. आपल्याला आमच्या समुपदेशन सेवा देणे
 4. आपल्याकडून येणार्‍या संप्रेशनांना उत्तर देणे
 5. आमच्या वेबसाइटच्या आपल्या वापराचे विश्लेषण करणे [आणि अभिप्राय जमवणे] जेणेकरून आम्ही आमची वेबसाइट आणि आपला वापरकर्ता अनुभव सतत सुधारू शकू.

3. आपल्या स्पष्ट संमतीने आणि जिथे कायद्याने मान्य असेल तिथे, आम्ही आपली माहिती संशोधन उद्देश्यांसाठी देखील वापरू शकतो ज्यामध्ये आपल्याला ईमेलद्वारे संपर्क करणे सुद्धा समाविष्ट असू शकते. आम्ही ती सर्व पाऊले उचलू ज्यामुळे हे सुनिश्चित होईल की आम्ही आपल्या हक्कांचे संपूर्णपणे संरक्षण केले आहे आणि पालन केले आहे. असे करताना लागू कायदे आणि नियमांचे पालन केले आहे. जेव्हा आम्ही आपली माहिती संशोधन उद्देश्यांसाठी वापरतो, तेव्हा आम्ही आकडेवारीच्या स्वरुपात असलेली अनामिक माहिती वापरतो आणि ही माहिती आपण दिलेल्या मेडिकल आणि इतर माहितीसह आपल्याला वैयक्तिकरित्या जोडण्यासाठी वापरली जाऊ शकत नाही.

4. आम्ही हे सुनिश्चित करू की आपल्या हक्कांना धक्का न पोहोचवता, कायद्यानुसार, न्याय्य रीतीने आणि पारदर्शकरित्या आपल्या वैयक्तिक डेटा चा वापर केला जातो. आम्ही आपल्या वैयक्तिक डेटा चा वापर केवळ खालीलपैकी किमान एक लागू होत असल्यास करू:

 1. आपण एक किंवा अनेक विशिष्ट कारणांसाठी आपल्या वैयक्तिक डेटा चा वापर करण्यास संमती दिली आहे;
 2. आम्हाला लागू असलेल्या कायदेशीर बांधिलक्या पाळण्यासाठी आपल्या वैयक्तिक डेटा चा वापर करणे आवश्यक आहे;
 3. आपल्या वैयक्तिक डेटाचा वापर आपल्या आणि इतर सामान्य व्यक्तीच्या महत्त्वाच्या स्वारस्यांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक आहे;

5. आम्ही आपला डेटा कसा आणि कुठे संग्रहीत करतो?

1. सामान्यतः, वापरकर्त्याने विशिष्टपणे डेटा हटवण्यास सांगितल्याशिवाय आम्ही आपल्या द्वारे दिला गेलेला डेटा, आमच्याद्वारे संकलित केला गेलेला डेटा ज्यामध्ये लाइव्ह चॅट वैशिष्ट्याद्वारे झालेल्या समुपदेशन सेशनचे रेकॉर्ड किंवा ईमेल देवाणघेवाणी सामील असतात, ते जपून ठेवतो. कोणत्याही प्रसंगी, हे रेकॉर्ड ओळखू न येणार्‍या स्वरुपात संग्रहीत केले जातात ज्यामुळे आरोग्य माहिती आणि चॅट रेकॉर्ड वापरकर्त्यांशी वैयक्तिकरित्या जोडले जाऊ शकत नाही. त्याही पुढे जाऊन, आम्ही एक वार्षिक पुनरावलोकन करतो ज्यामध्ये आम्ही ठरवतो की आम्हाला आपला डेटा ठेवण्याची गरज आहे की नाही. आमच्या धोरणाच्या शर्तिंनुसार आम्हाला या डेटाची गरज नसल्यास आपला डेटा हटवण्यात येईल. काही केसमध्ये, लागू कायदे आणि नियमांनुसार आम्हाला या डेटाचे रेकॉर्ड जतन करावे लागू शकतात.

2. आपला काही किंवा सर्व डेटा यूरोपियन इकनॉमिक एरिया (“the EEA”) (EEA मध्ये सर्व EU सदस्य राज्य, अधिक नॉर्वे, आइसलॅंड आणि लिचेंस्टीनचा समावेश आहे) बाहेर जतन केला जाऊ शकतो. आपण आमची वेबसाइट वापरुन आणि आम्हाला माहिती सबमिट करुन यास स्वीकाराल आणि सहमत व्हाल. जर आम्ही EEA बाहेर डेटा संग्रहीत किंवा स्थानांतरीत केला तर, आम्ही आपला डेटा EEA मध्ये आणि GDPR अंतर्गत जितक्या सुरक्षितपणे हाताळला जाईल तितक्या सुरक्षितपणे हाताळणे सुनिश्चित करू. अशा चरणांमध्ये समाविष्ट आहे, पण यापुरता मर्यादित नाही, आम्ही आणि आम्ही संबंध ठेवणार्‍या कोणत्याही तृतीय पक्षादरम्यान कायदेशीरपणे बांधील कंत्राटी शर्ती वापरणे. वापरली जाणारी संरक्षके आहेत:

 1. डेटा SSL एनक्रिप्टेड प्रोटोकॉलद्वारे सुरक्षितपणे स्थानांतरीत केला जातो,
 2. डेटा कॅनडामध्ये एनक्रिप्टेड SSLlabs A/A+ रेट केलेल्या TLS वाहतूक सर्वरमध्ये सुरक्षितपणे संग्रहीत केला जातो

3. आमच्यावर लागू असलेल्या कोणत्याही स्थानिक कायद्यांमध्ये आवश्यक असल्यास, आम्ही आपल्या स्थानिक क्षेत्रामध्ये आपल्या वैयक्तिक माहितीच्या प्रती संग्रहीत करू.

4. आम्ही घेत असलेल्या सुरक्षा उपायांचा विचार न करता, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की इंटरनेटद्वारे डेटा स्थानांतरीत करणे पुर्णपणे सुरक्षित नसू शकते आणि इंटरनेट द्वारे आम्हाला डेटा संप्रेषित करत असताना आपण योग्य ती खबरदारी घ्यावी असा सल्ला दिला जातो.

6. आम्ही आपला डेटा शेअर करतो का?

 1. आम्ही आमच्या मूळ कंपनी आणि त्यांच्या सहाय्यक कंपन्यांसह (म्हणजे आमचे सहयोगी) आपला वैयक्तिक डेटा सामायिक करू शकतो जर असे डेटा सामायिक करणे या गोपनीयता धोरणाचे पालन करत असेल तर. असा वैयक्तिक डेटा दोनपैकी एका परिस्थितिमध्ये सामायिक केला जाईल: (I) आपल्याला समुपदेशन सेवा देण्यासाठी डेटा सामायिक करणे आवश्यक असते किंवा (ii) संशोधन करण्याच्या उद्देश्यांसाठी डेटा सामायिक केला जातो; ज्यामध्ये केवळ एकत्रित आणि अनामिक डेटा सामायिक केला जातो.
 2. आपल्याला कार्यक्षम सेवा देण्यासाठी आम्ही तृतीय पक्षांसह कंत्राट करू शकतो. यामध्ये सर्च इंजिन सुविधा, Google विश्लेषणे, जाहिरात आणि विपणन, सर्वेक्षण, ऑन लाइन चॅट टूल इत्यादि समाविष्ट असू शकतात. काही केसमध्ये, तृतीय पक्षांना आपल्या काही किंवा सर्व डेटाची ऍक्सेस आवश्यक असू शकते. अशा उद्देश्यासाठी आपला कोणताही डेटा आवश्यक असल्यास, आम्ही आपली संमती घेऊ आणि आपला डेटा आपले हक्क, आमची बांधिलकी आणि कायद्याअंतर्गत तृतीय पक्ष बांधिलक्यांच्या अंतर्गत सुरक्षितपणे हाताळला जाईल हे सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक पाऊले उचलू. आम्ही सध्या यांच्याशी करार करतो:
पार्टीचे नाव:हेतू:उघड केलेला डेटा:
Google विश्लेषणेप्रभाव आणि प्रेक्षक याबद्दल आकडेवारी मिळवणेयासाठी Google कडे स्वतःचे पृष्ठ आहे तपशील: https://support.google.com/analytics/answer/6318039?hl=en
Zendeskरीयल टाइम समुपदेशन देणेईमेल, नाव आणि वापरकर्ता आणि समुपदेशकामधील सर्व संदेश
 1. आम्ही आमच्या वेबसाइटच्या वापराबद्दलची आकडेवारी एकत्रित करू ज्यामध्ये ट्रॅफिकमधील डेटा, वापर पॅटर्न आणि इतर माहिती समाविष्ट असू शकते. असा सर्व डेटा अनामिक असला पाहिजे आणि त्यामध्ये आमच्या वापरकर्त्यांबद्दल कोणतीही वैयक्तिकरित्या ओळख पटणारी माहिती समाविष्ट नसेल. आम्ही वेळोवेळी असा डेटा तृतीय पक्षांसह सामायिक करू शकतो. डेटा केवळ लागू कायदे आणि नियमांमध्येच सामायिक केला जाईल आणि वापरला जाईल.
 2. काही परिस्थितींमध्ये आमच्याद्वारे ठेवलेला काही डेटा आम्हाला कायदेशीरपणे सामायिक करावा लागू शकतो, जेव्हा आम्ही कायदेशीर कारवायांमध्ये सामील असतो, जेव्हा आम्ही कायद्याच्या आवश्यकतांचे पालन करत असतो, कोर्ट ऑर्डरमध्ये किंवा सरकारी अधिकार्‍यांद्वारे मागितला जातो तेव्हा. अशा परिस्थितींमध्ये आपला डेटा सामायिक करण्यासाठी आम्हाला आपल्याकडून इतर कोणत्याही संमतीची आवश्यकता नसते आणि आमच्याकडे केलेल्या कोणत्याही कायदेशीररित्या बांधील विनंतीचे आम्ही पालन करू.

7. सुरक्षा

आम्ही वापरकर्त्याच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यासाठी योग्य त्या तांत्रिक आणि मानक सुरक्षा प्रक्रिया आणि पद्धती लागू करतो. आपली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आमचे कर्मचारी, एजेंट आणि सहयोगी त्यांच्या वाजवी नियंत्रणात असलेले सर्वकाही करतात.

आमचे कोणतेही कर्मचारी किंवा एजेंट मुख्यतः आमचे समुपदेशक आणि पॅनलमधील मेडिकल प्रॅक्टिशनर आणि डॉक्टर यांच्याकडे समुपदेशन सेवा देण्यासाठी संवेदनशील वैयक्तिक माहितीचा ऍक्सेस असेल किंवा ते ती व्यवस्थापित करतील, अशी माहिती त्यांच्यासह सामायिक करण्याआधी अशा वापरकर्ता माहितीची गोपनीयता सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी गोपनीयता करार केला आहे. आंतरिकपणे, सर्व वापरकर्ता महितीचा ऍक्सेस केवळ त्या लोकांपुरता मर्यादित करण्यात आला आहे ज्यांना त्यांच्या कामाच्या जबाबदर्‍या पूर्ण करण्यासाठी तिची गरज असते आणि ज्यांनी गोपनीयता करार केला आहे.

8. आपण आपला डेटा कसा नियंत्रित करू शकता?

आपण आमच्या वेबसाइटद्वारे माहिती सबमिट करता तेव्हा, आमचा आपल्या डेटाचा वापर मर्यादित करण्याचा पर्याय आपल्याला दिला जाऊ शकतो. आपल्या डेटाच्या आमच्या वापरावर आपल्याला खूप नियंत्रण देणे हे आमचे ध्येय आहे.

9. माहिती रोखून धरण्याचा किंवा मागे घेण्याचा अधिकार

आपण आमच्या वेबसाइटचा काही भाग डेटा अजिबात न देता अॅक्सेस करू शकता. परंतु, आमच्या वेबसाइटवरील सर्व फंक्शन आणि वैशिष्ठ्ये वापरण्यासाठी आपल्याला काही डेटा सबमिट करावा लागू शकतो किंवा त्याच्या संकलनासाठी अनुमति द्यावी लागू शकते.

आम्ही आपला वैयक्तिक डेटा वापरण्याची आपली संमती आपण दिलेले तपशील वापरुन आम्हाला संपर्क करून कधीही मागे घेऊ शकता आणि आम्ही आमच्या सिस्टिममधून आपला डेटा हटवू. परंतु, आपण हे समजले पाहिजे की यामुळे आपल्याला उत्कृष्ठ समुपदेशन सेवा देण्याची आमची क्षमता मर्यादित होऊ शकते.

10. आपण आपला डेटा कसा ऍक्सेस करू शकता?

आमच्याद्वारे ठेवलेल्या आपल्या कोणत्याही वैयक्तिक डेटाची प्रत मागण्याचा आपल्याला कायदेशीर अधिकार आहे. कृपया आम्हाला अधिक माहितीसाठी येथे संपर्क करा. privacy@safe2choose.org

11. आम्ही कुकी वापरतो का?

आमची वेबसाइट आपल्या कम्प्युटरवर किंवा उपकरणावर कुकी ठेवत नाही आणि ऍक्सेस करत नाही. आपल्या सुरक्षेसाठी आणि गोपनीयतेसाठी, आम्ही काळजीपूर्वकपणे कूकी न वापरण्याचे ठरवले आहे ज्यामुळे आपली गोपनीयता सर्वकाळ सुरक्षित राहील आणि तिचा आदर ठेवला जाईल.

परंतु, आमची वेबसाइट तिला भेट देणार्‍या लोकांना अधिक जाणून घेण्यासाठी वापर आकडेवारे संकलित करून तिचे विश्लेषण करण्यासाठी Google विश्लेषणेद्वारे दिल्या जाणार्‍या विश्लेषण सेवांचा वापर करते. आम्ही याचा वापर केल्याने आपली गोपनीयता किंवा आपला आमच्या वेबसाइटचा सुरक्षित वापर यावर काहीही परिणाम होत नाही, पण यामुळे आम्ही सतत आमची वेबसाइट सुधारू शकतो,

12. लिंक केलेल्या वेबसाइट

या वेबसाइटवर इतर वेबसाइटची लिंक असू शकते. कृपया लक्षात घ्या की इतर वेबसाइटच्या गोपनीयता पद्धतींसाठी आम्ही जबाबदार नाही. आम्ही वापरकर्त्यांना ते ही वेबसाइट सोडून जात असताना सतर्क राहण्यासाठी आणि वैयक्तिक माहिती संकलित करणार्‍या कोणत्याही वेबसाइटला भेट देत असताना तिचे गोपनीयता विधान वाचण्यासाठी प्रोत्साहित करतो आम्ही कोणत्या वेबसाइटसह लिंक करत आहोत हे आम्ही खूप काळजीपूर्वक निवडत असलो तरीही, हे गोपनीयता धोरण केवळ आमच्या स्वतःच्या वेबसाइटवर संकलित केलेल्या माहितीवर लागू होते.

13. आमच्याशी संपर्क करणे

आपल्याला आमच्या वेबसाइटबद्दल किंवा या गोपनीयता धोरणाबद्दल काहीही प्रश्न असल्यास, कृपया आम्हाला ईमेलद्वारे privacy@safe2choose.org येथे संपर्क करा. कृपया हे सुनिश्चित करा की आपला प्रश्न स्पष्ट आहे, खासकरून ती आम्ही आपला जो डेटा जतन करतो त्याबद्दलची विनंती असल्यास.

14. आमच्या गोपनीयता धोरणांमध्ये बदल

या गोपनीयता धोरणामध्ये आम्हाला आवश्यक वाटेल त्याप्रमाणे किंवा कायद्यानुसार आवश्यक असेल तेव्हा, आम्ही वेळोवेळी बदल करू शकतो. कोणतेही बदल आमच्या वेबसाइटवर त्वरित पोस्ट केले जातील आणि बदल केल्यानंतर आपल्या आमच्या वेबसाइटच्या पहिल्या वापरानंतर आपण या शर्ती मान्य कराल. अप-टू-डेट राहण्यासाठी आपण हे पृष्ठ नियमितपणे तपासावे अशी आम्ही शिफारस करतो.

आपण हे मान्य करता की आमच्या ओळख वेगळी करण्याच्या आणि अनामिक करण्याच्या धोरणांमुळे आमच्या गोपनीयता धोरणांमध्ये होणार्‍या बदलांबद्दल आम्ही आपल्याला आगाऊ सूचना देणे कदाचित शक्य होणार नाही. तथापि, आमच्या गोपनीयता धोरणामध्ये होणार्‍या बदलाचा आम्ही आपला वैयक्तिक डेटा संग्रहीत करणे आणि वापरणे यावर थेट परिणाम होत असल्यास, आमच्या गोपनीयता धोरणामध्ये होणार्‍या बदलांबद्दल आपल्याला सूचित करण्याच्या आणि बदल लागू होण्यापूर्वी आपल्याला आपला डेटा हटवण्याची संधी देण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असेल.

Last updated on 11/02/2021