मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टॉल वापरुन गर्भपात कसा करावा

मेडिकल गर्भपात मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टॉल एकानंतर एक घेऊन किंवा केवळ मिसोप्रोस्टॉल घेऊन करता येऊ शकतो. या पृष्ठामध्ये गोळ्यांद्वारे केल्या जाणार्‍या गर्भपातासाठी मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टॉलच्या संयोजनाबद्दल तपशीलवार माहिती दिलेली आहे. आपण केवळ मिसोप्रोस्टॉल मिळवू शकत असल्यास ही मार्गदर्शिका पहा.

सुरू करण्यापूर्वी

हे लक्षात ठेवा की ही माहिती आपल्या शेवटच्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून मोजून 11 आठवडे किंवा कमी वेळेच्या गर्भधारणांमध्ये गोळ्यांद्वारे गर्भपात करण्यासाठी उपयुक्त आहे [1]. आम्ही 11 आठवड्यांवरील गर्भधारणेच्या गर्भपातांना समर्थन प्रदान करण्यासाठी प्रशिक्षित नसल्यामुळे, तसे करण्यासाठी सक्षम असणार्‍या कोणालातरी आपली शिफारस करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू.

मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टॉल यांचे संयोजन करणे खूप प्रभावी (95%) आहे [2] 11 आठवडे किंवा त्याहून कमी काळाची गर्भधारणा संपवण्यासाठी.

ही पद्धत आपल्यासाठी सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी, आम्ही शिफारस करतो की आपण मागील गर्भपाताच्या गोळ्या वापरण्याच्या कॉंट्राइंडिकेशन हा विभाग वाचावा. ही प्रक्रिया हा आपल्यासाठी योग्य पर्याय आहे की नाही याबद्दल आपल्याला खात्री नसल्यास, आमच्याशी संपर्क साधा..

मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टॉल डोस

9 आठवड्यांहून कमी गर्भधारणा असणार्‍या महिलांसाठी मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टॉलचा डोस: आपल्याला मिफेप्रिस्टोनची 1 आणि मिसोप्रोस्टॉलच्या 4 गोळ्यांची आवश्यकता असेल आणि मिसोप्रोस्टॉलच्या अतिरिक्त 4 गोळ्या (मिसोप्रोस्टॉलच्या एकूण 8 गोळ्या) घेण्याची शिफारस केली जाते. [3]

9-11 आठवड्यांमधील गर्भधारणा असणार्‍या महिलांसाठी मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टॉलचा डोस: आपल्याला मिफेप्रिस्टोनची 1 आणि मिसोप्रोस्टॉलच्या किमान 4 गोळ्यांची आवश्यकता असेल, परंतु आपण 9-11 आठवड्यांदरम्यान गर्भवती असल्यामुळे मिसोप्रोस्टॉलच्या अतिरिक्त 4 गोळ्या घेण्याची तीव्र शिफारस केली जाते (मिसोप्रोस्टॉलच्या एकूण 8 गोळ्या). 8 गोळ्या मिळवणे कठीण असल्यास, आपण मिसोप्रोस्टॉलच्या केवळ 4 गोळ्या घेऊ शकता, पण त्यांचा प्रभाव कमी होईल. [4]

मिफेप्रिस्टोनची गोळी 200 mg (किंवा 200 mg च्या जवळपास) असली पाहिजे आणि प्रत्येक मिसोप्रोस्टॉलची गोळी 200 mcg असली पाहिजे. [5]

आपल्याला मिळणार्‍या गोळ्यांचा mg आणि/किंवा mcg डोस वेगळा असल्यास, आपल्याला एकूण गोळ्यांची संख्या पुन्हा मोजावी लागेल जेणेकरून आपण औषधाची योग्य मात्रा घेऊ शकाल.

आपल्याला कोणतेही प्रश्न असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा. आपल्या गर्भपाताच्या संपूर्ण प्रकियेदरम्यान आपल्याला समर्थन देण्यासाठी आम्ही आहोत.

सुरक्षित गर्भपातासाठी मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टॉल कसे घ्यावेत

protocol-medical-abortion-mifepristone-misoprostol

चरण 1: मिफेप्रिस्टोनची गोळी पाण्यासह गिळा.

मिफेप्रिस्टोनची गोळी घेतल्यावर पहिल्या 30 मिनिटांमध्ये आपल्याला उल्टी झाल्यास, असे शक्य आहे की गोळीने परिणाम केला नाही. असे झाल्यास, आपल्याकडे अतिरिक्त मिफेप्रिस्टोन असल्यास, आपल्याला चरण 1 पुन्हा करावे लागेल. अन्यथा, आमच्याशी संपर्क साधा.

मिफेप्रिस्टोन घेतल्यावर 24-48 तास थांबा.

पुढील चरण सुरू करण्यासाठी आपण 24 तास आणि 48 तासांदरम्यान थांबण्याचे निवडू शकता. त्या काळमर्यादेमध्ये, मिसोप्रोस्टॉलच्या प्रभावीपणामध्ये काहीच फरक पडत नाही.

हे लक्षात असू द्या की आपल्याला अधिकतम लक्षणे मिसोप्रोस्टॉल घेतल्यानंतर काही वेळाने जाणवतील, त्यामुळे आपल्याला आणि आपल्या दिनचर्येला अत्यंत सोयिस्कर अशी वेळ निवडा. आपण कोणत्याही जबाबदार्‍यांशिवाय घरी असाल अशी वेळ निवडण्याची शिफारस केली जाते.

चरण 2: मिसोप्रोस्टॉल वापरण्याच्या 1 तास आधी 800 mg इबुप्रोफेन घ्या.

या चरणाची आवश्यकता नाही पण त्याची तीव्र शिफारस केली जाते. इबुप्रोफेनमुळे पोटदुखीची तीव्रता कमी होईल आणि आपल्याला मिसोप्रोस्टॉलचे संभाव्य विपरीत परिणामजसे डोकेदुखी, ताप आणि/किंवा थंडी यांना तोंड देण्यास मदत होईल [6]. हे लक्षात ठेवा की इबुप्रोफेन पूर्ण प्रक्रियेदरम्यान आणि त्यानंतर गरज असेल तेव्हा वापरले जाऊ शकते. इबुप्रोफेन आणि NSAID यांना एलर्जिक असलेल्या महिला वेदना कमी करण्यासाठी पर्यायांची शिफारस पाहण्यासाठी FAQs या पृष्ठाची मदत घेऊ शकतात.

आपल्याकडे मळमळ कमी करण्याचे औषध असल्यास, आपण ते यावेळी घेऊ शकता.

चरण 3: 4 मिसोप्रोस्टॉलच्या गोळ्या आपल्या जिभेखाली (सबलिंगुअल पद्धतीने) 30 मिनिटे ठेवा.

गोळ्यांनी आपल्या जिभेखाली 30 मिनिटे राहणे खूप आवश्यक आहे जेणेकरून त्यांना आपल्या शरीरप्रणालीमध्ये शोषून घेण्यासाठी वेळ मिळेल. 30 मिनिटांनंतर उरलेले गोळ्यांचे अवशेष गिळण्यासाठी आपण पाणी पिऊ शकता. [7]

मिसोप्रोस्टॉलच्या गोळ्या आपल्या जिभेखाली असताना 30 मिनिटांमध्ये आपण उल्टी केल्यास, त्या कदाचित प्रभाव करणार नाहीत. असे झाल्यास, त्वरितपणे चरण 4 पुन्हा करणे आवश्यक आहे.

गोळ्या आपल्या जिभेखाली 30 मिनिटे राहिल्यानंतर आपल्याला उल्टी झाल्यास, चरण 4 पुन्हा करण्याची काहीच गरज नाही कारण गोळ्या आधीच आपल्या शरीरप्रणालीमध्ये शोषून घेतल्या गेलेल्या असतील.

3 तास थांबा

– 9 आठवड्यांपेक्षा कमी काळ गर्भवती असलेल्या महिलांनी, केवळ आपण मिसोप्रोस्टॉल वापरुन 3 तास होऊन गेले असतील आणि आपल्याला अजिबात रक्तस्त्राव झाला नसेल किंवा आपल्या नेहमीच्या मासिक पाळीपेक्षा कमी रक्तस्त्राव झाला असेल तरच पुढे चरण 5 वर जावे.

– 9-11 आठवड्यांदरम्यान गर्भवती असलेल्या महिलांनी, रक्तस्त्राव कितीही असला तरी पुढे चरण 5 वर जावे.

आपण आमच्याशी संपर्क देखील साधू शकता..

चरण 4: अजून 4 मिसोप्रोस्टॉलच्या गोळ्या आपल्या जिभेखाली (सबलिंगुअल पद्धतीने) 30 मिनिटे ठेवा

[9-11 आठवडे गर्भवती किंवा मागील चरणामध्ये अजिबात रक्तस्त्राव न झालेल्या महिलांसाठी]

अतिरिक्त 3 तास जाऊन देखील आपल्याला कोणताही रक्तस्त्राव किंवा वेदना न झाल्यास, आमच्याशी संपर्क साधा. आपण एकत्रितपणे परिस्थितिचा आढावा घेईपर्यंत अजून गोळ्या घेऊ नका.

मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टॉलची अपेक्षित लक्षणे

मिफेप्रिस्टोन घेतल्यानंतर, अधिकतम महिलांना काहीच लक्षणे दिसत नाहीत, याचाच अर्थ त्यांना काहीच जाणवत नाही. मिफेप्रिस्टोन घेतल्यानंतर आपल्याला रक्तस्त्राव झाला तरी, प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी आपण मिसोप्रोस्टॉल घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. [8]

मिसोप्रोस्टॉल घेतल्यानंतर आपल्याला पोटदुखी आणि रक्तस्त्राव होईल. काही महिलांच्या (सर्वांच्या नाही) रक्ताच्या गाठी पडतील. पोटदुखी आणि रक्तस्त्राव नेमके कधी सुरू होतील हे जाणणे शक्य नाही, साधारणपणे ते 1-2 तासांमध्ये सुरू होतात, पण याला अनेक तास देखील लागू शकतात. [9]

अपेक्षित रक्तस्त्राव आपल्या मासिक पाळीहून अधिक असू शकतो किंवा निदान तितका असू शकतो. गोळ्या वापरल्यानंतर आपल्याला अनेक दिवस किंवा आठवडे अधूनमधून रक्तस्त्राव होऊ शकतो. आपली रक्तस्त्राव आणि गर्भधारणेची लक्षणे पुढील काही आठवड्यांमध्ये हळूहळू कमी झाली पाहिजेत. [10]

10-11 आठवड्यांमधील महिला, आपल्याला रक्तस्त्राव आणि पोटदुखीची लक्षणे असतील, पण आपण कदाचित गर्भ बाहेर पडतानादेखील पाहू शकता [1]. बहुतेकदा हा गर्भ रक्त आणि रक्ताच्या गाठींमध्ये असतो आणि त्यामुळे बरेचदा लक्षात येत नाही, पण आपल्याला तो दिसल्यास, हे माहीत असणे आवश्यक आहे की हे खूप स्वाभाविक आहे. घाबरून जाऊ नका, त्याला सॅनिटरी पॅडमध्ये गुंडाळून फेकले जाऊ शकते किंवा टॉयलेटमध्ये फ्लश केले जाऊ शकते.

हे लक्षात ठेवा की प्रत्येक गर्भपाताचा अनुभव वेगळा असतो आणि लक्षणे प्रत्येक महिलेला वेगळी असू शकतात.

गर्भधारणेची लक्षणे असलेल्या अधिकतम महिलांना मिसोप्रोस्टॉल घेतल्यानंतर साधारण 5 दिवसांनंतर ती दिसणे बंद होते. गोळ्या घेतल्यानंतर आपली गर्भधारणेची लक्षणे कमी होत जाऊन संपल्यास, आपण गर्भवती नसल्याचे हे एक खूप चांगले चिन्ह आहे. [11]

मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टॉलचे विपरीत परिणाम

मिसोप्रोस्टॉल वापरल्यानंतर, काही महिलांना विपरीत परिणाम जाणवतात जे काही तास किंवा दिवस राहू शकतात [12]. या विपरीत परिणामांमध्ये सामील आहेत:

 • ताप
 • जुलाब
 • मळमळ / उल्टी
 • डोकेदुखी
 • थंडी

Side_effects_abortion_pills_mifepristone_misoprostol

सावधगिरी

अति रक्तस्त्राव आणि/किंवा इन्फेक्शन टाळण्यासाठी, हे महत्त्वाचे आहे की पुढील आठवडे किंवा आपला रक्तस्त्राव कमी होईपर्यंत [13], आपण पुढील सावधगिरी बाळगावी:

 • आपल्या योनीमध्ये टॅम्पॉन आणि मेन्स्टृअल कप सारख्या गोष्टी घालणे टाळा
 • तीव्र शारीरिक क्रियाकलाप टाळा (व्यायाम करणे, जड वस्तु उचलणे आणि ढकलणे किंवा खेचणे, सामान्यहून अधिक चालणे किंवा खूप जिने चढणे)
  टीप: गर्भपाताच्या गोळ्या घेतल्यानंतर शारीरिक संबंधांत सहभागी होण्यासाठी थांबण्याची कोणतीही शिफारस केलेली काळमर्यादा नाही, पण बहुतेकदा आपण अति रक्तस्त्राव थांबेपर्यंत वाट बघावी आणि आपल्या शरीराचा आणि इच्छांचा कौल घ्यावा अशी शिफारस केली जाते. [14]

precautions-to-take-after-abortion-pills

चेतावणीची चिन्हे: मदत घेणे

आपल्याला खालीलपैकी एखादे लक्षण असल्यास, हे आपली परिस्थिति गंभीर होत असल्याचे चेतावणीचे चिन्ह असू शकते आणि आपण त्वरित मेडिकल मदत घेतली पाहिजे:

 • आपले 2 किंवा अधिक पॅड (समोरून मागेपर्यंत आणि कडेपासून कडेपर्यंत पूर्ण भिजलेले असतील) 1 तास किंवा त्याहून कमी वेळामध्ये भिजले असतील आणि असे सलग 2 तास किंवा त्याहून अधिक वेळ झाले असेल.
 • 38 डिग्री सेल्सियस (100.4 डिग्री फॅरनहाइट) चा ताप जो इबुप्रोफेन खाऊन कमी होत नसेल. नेहमी थर्मामीटरने पुष्टी करा.
 • 38 डिग्री सेल्सियस (100.4 डिग्री फॅरनहाइट) चा ताप जो मिसोप्रोस्टॉल घेतल्यानंतर 24 तासांनी कमी होत नसेल. नेहमी थर्मामीटरने पुष्टी करा.
 • इबुप्रोफेन घेतल्यानंतर कमी न होणार्‍या वेदना.
 • आपल्या मासिक पाळीपेक्षा आपल्या रक्ताचा रंग आणि वास खूप वेगळा आहे किंवा घाण वास येत आहे.
 • आपल्याला लालसरपणा, खाज किंवा हाताला, गळ्याला आणि चेहर्‍याला सूज जाणवत असल्यास, आपल्याला औषधांची एलर्जिक रिऍक्शन झालेली असू शकते. आपण अँटीहिस्टामाइन घेऊ शकता, पण आपल्याला श्वास घ्यायला त्रास झाल्यास, एलर्जिक रिऍक्शन खूप गंभीर आहे आणि आपल्याला त्वरित मेडिकल देखभालीची गरज आहे. [15]

Warning-signs-during-an-abortion-with-pills

लेखक:

safe2choose टीम आणि कॅराफेम मधील समर्थन देणार्‍या तज्ञांद्वारे, द नॅशनल अबॉर्शन फंड (NAF) यांच्या 2020 च्या शिफारसींवर आधारित.

द नॅशनल अबॉर्शन फेडरेशन ही उत्तर अमेरिकेतील गर्भपात सुविधा पुरवणार्‍या प्रदात्यांची व्यावसायिक संस्था आहे.

कॅराफेम एक सोयिस्कर आणि व्यावसायिक गर्भपात आणि कुटुंब नियोजन सेवा प्रदान करते ज्यामुळे लोक त्यांच्या मुलांची संख्या आणि त्यांच्यामधील अंतर नियंत्रित करू शकतात.


स्त्रोत

[1] नॅशनल अबॉर्शन फेडरेशन. 2020 गर्भपाताच्या देखभालीसाठी क्लिनिकची धोरण मार्गदर्शकतत्त्वे. येथून मिळवली: https://5aa1b2xfmfh2e2mk03kk8rsx-wpengine.netdna-ssl.com/wp-content/uploads/2020_cpgs_final.pdf

[2] गुटमाकर इंस्टीट्यूट. मेडिकल गर्भपात. येथून मिळवली: https://www.guttmacher.org/evidence-you-can-use/medication-abortion

[3] Platais I, Tsereteli T, Grebennikova G, Lotarevich T, Winikoff B. कझाकस्तानमध्ये गर्भधारणेच्या 10 आठवड्यांपर्यंत गर्भपातासाठी मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टॉलच्या घरगुती वापराचा भावी अभ्यास. येथून मिळवली: https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/?term=Prospective+study+of+home+use+of+mifepristone+and+misoprostol+for+medical+abortion+up+to+10+weeks+of+pregnancy+in+Kazakhstan

[4] Gynuity. पहिल्या तिमाहीतील मेडिकल गर्भपातासाठी केवळ मिसोप्रोस्टॉलची कार्यक्षमता: एक पद्धतशीर पुनरावलोकन. येथून मिळवली: https://gynuity.org/resources/efficacy-of-misoprostol-alone-for-first-trimester-medical-abortion-a-systematic-review

[5] Elizabeth G. Raymond, Caitlin Shannon, Mark A, Weaver, Beverly Winikoff. मिफेप्रिस्टोन 200 mg आणि मिसोप्रोस्टॉलसह पहिल्या तिमाहीतील मेडिकल गर्भपात: एक पद्धतशीर पुनरावलोकन. येथून मिळवली: https://www.contraceptionjournal.org/article/S0010-7824(12)00643-9/fulltext

[6] Livshits, Anna et al. प्रजनन क्षमता आणि वंध्यत्व, वॉल्यूम 91, आवृत्ती 5, 1877 – 1880. मेडिकल गर्भपाता दरम्यान वेदना कमी करण्यासाठी इबुप्रोफेन आणि पॅरासिटामॉल: डबल ब्लाइंड यादृच्छिक नियंत्रित अभ्यास. येथून मिळवली: https://www.fertstert.org/article/S0015-0282(08)00176-3/fulltext

[7] वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइझेशन. सुरक्षित गर्भपात: स्वास्थ्य प्रणाल्यांसाठी तांत्रिक आणि धोरण मार्गदर्शक. येथून मिळवली: https://apps.who.int/iris/bitstream/handle/10665/70914/;jsessionid=B7AEEBE4F34809D869F73B1ABA7F6221?sequence=1

[8] De Nonno LJ, Westhoff C, Fielding S, Schaff E. मिफेप्रिस्टोनद्वारे केलेल्या गर्भपातानंतर वेदना आणि रक्तस्त्राव होण्याची वेळ. येथून मिळवली: https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/11239617

[9] Gynuity. कमी साधने असलेल्या सेटिंगमध्ये मेडिकल गर्भपात उपलब्ध करणे: एक प्रास्ताविक मार्गदर्शिका. दुसरी आवृत्ती. येथून मिळवली: https://gynuity.org/assets/resources/clinguide_maguide2nd_edition_en.pdf

[10] नियोजित पालकत्व. गर्भपाताची गोळी कसे कार्य करते? येथून मिळवली: https://www.plannedparenthood.org/learn/abortion/the-abortion-pill/how-does-the-abortion-pill-work

[11] Gynuity. लक्षणे आणि घरगुती गर्भधारणा चाचणीचा वापर करून मेडिकल गर्भपात परिणामाचे स्व-मूल्यांकन. येथून मिळवली: https://gynuity.org/resources/self-assessment-of-medical-abortion-outcome-using-symptoms-and-home-pregnan

[12] नॅशनल अबॉर्शन फेडरेशन. मेडिकल गर्भपाताचे अपेक्षित विपरीत परिणाम. येथून मिळवली: https://prochoice.org/online_cme/m2expected2.asp

[13] A.R. Davis, C.M. Robilotto, C.L. Westhoff, S. Forman, J. Zhang. लवकर झालेल्या गर्भपाताच्या उपचारासाठी योनीसाठी मिसोप्रोस्टॉल वापरल्यानंतरच्या रक्तस्त्रावाचे पॅटर्न. येथून मिळवली: https://academic.oup.com/humrep/article/19/7/1655/2356520

[14] Ipas. (2019). पुनरुत्पादात्मक आरोग्यामधील क्लिनिकल अद्यतने. L. Castleman & N. Kapp (Eds.). Chapel Hill, NC: Ipas. येथून मिळवली: https://ipas.azureedge.net/files/CURHE19-april-ClinicalUpdatesInReproductiveHealth.pdf

[15] NHS. गर्भपात-धोके. येथून मिळवली: https://www.nhs.uk/conditions/abortion/risks/

Last updated on 10/02/2021