गोळ्यांद्वारे केला जाणारा गर्भपात

मेडिकल गर्भपाताला [1] सामान्यतः गोळ्यांद्वारे केला जाणारा गर्भपात म्हणतात. काही लोक याला स्वतःहून केलेला गर्भपात, स्वतः-व्यवस्थापित केलेला गर्भपात [2] किंवा स्वतःहून केला जाणारा (DIY) गर्भपात म्हणतात.

आपण गर्भपाताच्या गोळ्या वापरल्यास, आपल्याला रक्तस्त्राव आणि पोटदुखी जाणवेल. ही लक्षणे आपली मासिक पाळी किंवा आपला गर्भपात (नैसर्गिक) होतानाच्या लक्षणांशी खूप जुळणारी आहेत.

गर्भपाताच्या गोळ्या या सामान्यतः मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टॉल यांना मागोमाग वापरणे किंवा केवळ मिसोप्रोस्टॉल वापरणे अशाप्रकारे संदर्भित असतात.

मिफेप्रिस्टोन

– मिफेप्रिस्टोन एक असे औषध आहे जे प्रोजेस्टेरॉनचा प्रवाह थांबवते, जो एक असा हॉर्मोन आहे जो गर्भधारणेला आधार देतो. प्रोजेस्टेरॉनशिवाय गर्भधारणा वाढू शकत नाही.[3]

– मिफेप्रिस्टोन हे गर्भाशय ग्रीवेला (गर्भाशयाचा खालचा भाग) मुलायम देखील करते ज्यामुळे मिसोप्रोस्टॉलचा प्रभाव वाढतो. [4]

– केवळ मिफेप्रिस्टोन गर्भपात करण्यासाठी पुरेसे नाही, मिसोप्रोस्टॉल सुद्धा आवश्यक आहे. [5]

– मिफेप्रिस्टोन मुख्यतः गर्भपात आणि नैसर्गिक गर्भपातासाठी वापरले जाते त्यामुळे, प्रत्येक देशातील कायदे आणि निर्बंधांच्या आधारावर, ते मिळणे कधीकधी कठीण होऊ शकते. [6]

मिसोप्रोस्टॉल

– मिसोप्रोस्टॉल एक असे औषध आहे जे गर्भाशयाला हालचाल करायला (किंवा आखडायला) लावते आणि यामुळे पोटदुखी आणि रक्तस्त्राव होतो ज्यामुळे गर्भ बाहेर यायला मदत होते.

– मिफेप्रिस्टोन शिवाय मिसोप्रोस्टॉल वापरुन मेडिकल गर्भपात करता येतो, पण दोन्ही औषधे एकत्र घेणे जास्त प्रभावी आहे.

– मिसोप्रोस्टॉलचे गर्भपात करण्याव्यतिरिक्त इतर मेडिकल वापर आहेत (प्रसूती सुरू करणे, प्रसूतीनंतरचा रक्तस्त्राव, अल्सर इ), त्यामुळे ते साधारणतः अधिक सुलभपणे उपलब्ध असते. [7]

मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टोल हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइज़ेशन यांच्या अनुसार आवश्यक औषधे म्हणून यादीबद्ध आहेत आणि सुरक्षित गर्भपात हा त्यांचा हेतु आहे. [8]

मिसोप्रोस्टॉल आणि मिफेप्रिस्टोन वापरुन सुरक्षित आणि प्रभावीपणे गर्भपात कसा करावा याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. आपण केवळ मिसोप्रोस्टॉल वापरत असल्यास येथे क्लिक करा.

गर्भपाताच्या गोळ्यांची सुरक्षितता आणि कॉंट्राइंडिकेशन (न करण्याच्या परिस्थिति):

अधिकांश महिलांसाठी मेडिकल गर्भपात सुरक्षित असतात. गर्भपाताच्या गोळ्या वापरण्यामध्ये खूप मोजक्या मेडिकल परिस्थिति या कॉंट्राइंडिकेशन (न करण्याच्या परिस्थिति) आहेत. [9]

मिफेप्रिस्टोनची शिफारस केली जात नाही जर

– आपण दीर्घकाळ स्टेरॉइड वापरत असाल (जसे प्रेडनिसोन किंवा डेक्सामेथासोन).
परंतु, आपण केवळ मिसोप्रोस्टॉल वापरुन गर्भपात करू शकता.

मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टॉल या दोन्ही वापरण्याची शिफारस केली जात नाही जेव्हा [10]:

– आपण हेपॅरिन आणि वॉरफॅरिन सारखे रक्तसाकळणरोधक (रक्त साकळण्यापासून थांबवणारी द्रव्ये) वापरत आहात,

– आपल्याला पॉर्फायरिया सारखा रक्तस्त्रावाचा आजार आहे,

– आपल्याला क्रोनिक एड्रिनल फेल्यर आहे,

– आपल्याला मिफेप्रिस्टोन, मिसोप्रोस्टॉल किंवा प्रोस्टाग्लॅंडीनची एलर्जि आहे. आपण एलर्जिक आहात की नाही हे समजण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे आपण हे आधी वापरुन आपल्याला एलर्जिक परिणाम जाणवला असल्यास. आपण एलर्जिक आहात की नाही हे गोळ्या घेण्यापूर्वी समजणे अशक्य आहे.

– आपणास एक्टोपिक गर्भधारणा (गर्भाशया बाहेरील) असल्यास. या परिस्थितिमध्ये, गर्भपाताच्या गोळ्या आपल्याला नुकसान पोहोचवणार नाहीत, पण त्या गर्भधारणा थांबवणार नाहीत. आपल्याला एक्टोपिक गर्भधारणा आहे असे आपल्याला समजल्यास, आपण मेडिकल देखभाल घेतली पाहिजे.

आपण IUD (इंट्रायूटरिन डिव्हाइस) धारण केले असल्यास, ते गर्भपाताच्या गोळ्या वापरण्यासाठी कॉंट्राइंडीकेशन (न करण्याची परिस्थिति) नाही, पण काही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. एक्टोपिक गर्भधारणा (गर्भाशयात नसलेली गर्भधारणा) होण्याचा धोका आपण IUD धारण केले असल्यास वाढतो. IUD धारण केलेले असल्यास गोळ्या घेतल्यावर पोटदुखी सुद्धा अधिक तीव्र होऊ शकते. जेव्हाही शक्य असेल तेव्हा, गर्भपाताच्या गोळ्या घेण्याआधी IUD काढणे हे सर्वात सुरक्षित असल्याची शिफारस केली जाते. [11]

गर्भपाताच्या गोळ्या आपल्यासाठी सुरक्षित आहेत की नाही याबद्दल आपल्याला खात्री नसल्यास, आमच्याशी संपर्क साधा! ही पद्धत आपल्यासाठी योग्य आहे की नाही हे समजून घेण्यासाठी आम्ही आपली मदत करू शकतो.

हे लक्षात ठेवा की safe2choose केवळ त्या महिलांना समर्थन देण्यात प्रशिक्षित आहे ज्या त्यांच्या गर्भधारणेच्या पहिल्या 11 आठवड्यांमध्ये गर्भपाताच्या गोळ्या वापरतील. आपली गर्भधारणा अधिक वाढली असल्यास, आपल्याला मदत करू शकेल अशा अधिक सज्ज संस्थेत आपली शिफारस करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. [12]
Contraindications before using abortion pills

गोळ्यांद्वारे केल्या जाणार्‍या गर्भपातामध्ये काय अपेक्षित असते

गर्भपाताच्या गोळ्या वापरल्यानंतर आपल्याला मासिक पाळी किंवा नैसर्गिक गर्भपातासारखी लक्षणे जाणवतील. आपण मिफेप्रिस्टोन वापरत असल्यास, या औषधाने साधारणपणे काहीच लक्षणे दिसत नाहीत. अधिकतम लक्षणे मिसोप्रोस्टॉल वापरल्यानंतरच दिसतात.

अपेक्षित लक्षणांमध्ये सामील आहेत: पोटदुखी, रक्तस्त्राव आणि कदाचित रक्ताच्या गाठी पडणे. सामान्यतः मिसोप्रोस्टॉल वापरल्यानंतर पहिल्या 48 तासांमध्ये सर्वात तीव्र रक्तस्त्राव आणि पोटदुखी जाणवेल, परंतु आपल्याला अनेक दिवस किंवा आठवडे अधून मधून रक्तस्त्राव जाणवू शकतो. [13]

मिसोप्रोस्टॉलमुळे तात्पुरते साइड इफेक्ट होऊ शकतात जसे ताप, थंडी, जुलाब, मळमळ आणि डोकेदुखी. आपल्याला यामधील काहीच न जाणवल्यास तेही पुर्णपणे सामान्य आहे. आपल्याला काही जाणवल्यास, ते पुढील 48 तास किंवा त्याआधी निघून जाईल. [13]

साइड इफेक्ट कसे हाताळावेत हे जाणून घेण्यासाठीआमच्याशी संपर्क साधा.

गर्भपाताच्या गोळ्यांचा परिणाम झाला की नाही ते कसे समजेल

आपण शिफारस केलेल्या सुचनांप्रमाणे औषधे घेतल्यास आणि आपल्याला आपल्या मासिक पाळी इतका (किंवा त्याहून अधिक) रक्तस्त्राव अनेक तासांसाठी झाल्यास, मेडिकल गर्भपात यशस्वी झाल्याची खूप शक्यता आहे. आपली गर्भधारणेची लक्षणे (स्तन नाजुक होणे, मळमळ येणे, थकवा), हळूहळू कमी होतील आणि गर्भपाताच्या गोळ्या घेतल्यानंतर साधारण 5 दिवसांनंतर निघून जातील. गोळ्यांद्वारे यशस्वी काम झाल्याचे हे दुसरे खूप चांगले सूचक आहे. [11]

गरजेचे नसले, तरीही आपल्याला अधिक खात्री करून घ्यावीशी वाटल्यास आपण खालीलपैकी एक चाचणी करण्याचे ठरवू शकता:

– मूत्र चाचणी (यूरीन hcg): पुष्टी साठी करण्यात येणारी ही एक सर्वात सोपी चाचणी आहे, कारण ही आपल्याला घरच्या एकांतात करता येते. गर्भपाताच्या गोळ्या वापरल्यानंतर साधारण किमान 4 आठवडे थांबण्याची शिफारस केली जाते. प्रक्रिया यशस्वी झाल्यास, साधारण 4 आठवड्यांनंतर चाचणी निगेटीव्ह आली पाहिजे.

– रक्ताची चाचणी (परिमाणात्मक hcg): या चाचणीसाठी मेडिकल भेट आवश्यक आहे आणि यासाठी गर्भपाताच्या गोळ्या वापरण्याआधी तीच चाचणी केलेली असणे खूप उपयोगी आहे जेणेकरून हॉर्मोनच्या स्तराची तुलना करता येऊ शकते. ही चाचणी सहसा केली जात नाही आणि म्हणून आपल्याला खात्री करून घ्यायची असल्यास वर नमूद केलेल्या मूत्र चाचणीची अधिक शिफारस केली जाते. आपण ही चाचणी करण्याचे निवडल्यास, औषध घेतल्यानंतर प्रक्रिया यशस्वी झाल्यास गर्भधारणा हॉर्मोन साधारण 4 आठवड्यांनंतर नसला पाहिजे.

अल्ट्रासाऊंड: यासाठी मेडिकल भेटीची आवश्यकता आहे आणि चालू गर्भधारणा तपासण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. हे लक्षात असू द्या की गर्भपाताच्या गोळ्यांचा परिणाम झाला तरीही, किमान 2 आठवड्यांपर्यंत अल्ट्रासाऊंडमध्ये काही प्रमाणात रक्त आणि पेशी दिसू शकतात. गर्भधारणा संपली तरीही, कधीकधी अल्ट्रासाऊंड खूप लवकर केला जातो आणि महिलांना “अपूर्ण गर्भपात” झाल्याचे निदान केले जाते ज्यामुळे अनावश्यक शस्त्रक्रियांच्या प्रक्रिया केल्या जाऊ शकतात. आपण अल्ट्रासाऊंड करण्याचे ठरवल्यास, किमान 2 आठवडे थांबण्याची शिफारस केली जाते, आपली परिस्थिति अधिक गंभीर झाल्यामुळे अधिक लवकर अल्ट्रासाऊंड करण्याची गरज नसल्यास.

आपण आपला मिसोप्रोस्टॉलचा शेवटचा डोस घेऊन 48 तास झाले असल्यास आणि आपल्याला रक्तस्त्राव न झाल्यास किंवा आपला रक्तस्त्राव आपल्या मासिक पाळीपेक्षा कमी प्रमाणात झाल्यास, अशी शक्यता आहे की गर्भपात अयशस्वी झाला असेल. [14]

अधिकतम परिस्थितींमध्ये, पुन्हा एकदा गर्भपाताच्या गोळ्या घेऊन पाहणे शक्य आहे. आपण या परिस्थितितून जात असल्यास आम्ही आपल्याला समर्थन देऊ शकू यासाठी आमच्याशी संपर्क साधा.

गर्भपाताच्या गोळ्या घेतल्यानंतर घेण्याची मेडिकल देखभाल

आपली लक्षणे अपेक्षित केल्याप्रमाणे असल्यास आणि आपल्याला काही चेतावणीची चिन्हे न दिसल्यास, आपल्याला मेडिकल देखभाल घेण्याची काही आवश्यकता नाही. नंतर गर्भधारणा चाचणी करण्याची किंवा अल्ट्रासाऊंड करण्याची काही गरज नाही किंवा D&C सारख्या शस्त्रक्रियेच्या मध्यस्थीची देखील काही गरज नाही.
how-to-know-if-the-abortion-pills-were-effective

गर्भधारणेनंतर सुपीकता आणि मासिक पाळी

गर्भपातानंतर (शस्त्रक्रियेचा किंवा मेडिकल) आपली पाळी पुन्हा सुरू होईल, जसे की आपल्याला आपली मासिक पाळी येऊन गेली आहे. आपले ओव्हूलेशन पुन्हा सुरू होईल साधारण 10 दिवसांनंतर. याचा अर्थ असा की आपण संरक्षण न घेता शारीरिक संबंधांत भाग घेतल्यास आपण पुन्हा गर्भवती होऊ शकता. [11]
आपण पुन्हा गर्भवती होण्यास तयार नसल्यास, आपण गर्भधारणा न होण्यासाठी असलेल्या प्रक्रियांचा विचार केला पाहिजे. आपण http://findmymethod.org/ येथे अधिक माहिती मुळवू शकता.

गर्भपाताच्या गोळ्या वापरल्यानंतर साधारण 4 ते 6 आठवड्यांनंतर आपली पुढची मासिक पाळी येऊ शकते. [15]

लेखक:

safe2choose टीम आणि कॅराफेम मधील समर्थन देणार्‍या तज्ञांद्वारे , आणि द नॅशनल अबॉर्शन फंड (NAF) यांच्या 2020 च्या शिफारसींवर आधारित.

द नॅशनल अबॉर्शन फेडरेशन ही उत्तर अमेरिकेतील गर्भपात सुविधा पुरवणार्‍या प्रदात्यांची व्यावसायिक संस्था आहे.

कॅराफेम एक सोयिस्कर आणि व्यावसायिक गर्भपात आणि कुटुंब नियोजन सेवा प्रदान करते ज्यामुळे लोक त्यांच्या मुलांची संख्या आणि त्यांच्यामधील अंतर नियंत्रित करू शकतात.


स्त्रोत

[1] वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइझेशन. सुरक्षित गर्भपात: स्वास्थ्य प्रणाल्यांसाठी तांत्रिक आणि धोरण मार्गदर्शक. येथून मिळवली: https://apps.who.int/iris/bitstream/handle/10665/70914/;jsessionid=B7AEEBE4F34809D869F73B1ABA7F6221?sequence=1

[2] पुनरुत्पादक आरोग्य महत्त्वाचे आहे. मेडिकल गार्भपाताचे स्वयं-व्यवस्थापन: एक गुणात्मक पुरावा संश्लेषण. येथून मिळवली: https://www.tandfonline.com/doi/pdf/10.1016/j.rhm.2016.06.008?needAccess=true

[3] आपली मुले आपला निर्णय. मेडिकल गर्भपात. येथून मिळवली: https://www.childrenbychoice.org.au/foryou/abortion/medicationabortion

[4] S. Hopkins MD, M. Fleseriu MD. अध्याय 7 – कुशिंग रोगाचा वैद्यकीय उपचार. येथून मिळवली: https://www.sciencedirect.com/science/article/pii/B9780128043400000073

[5] Thoai D Ngo, Min Hae Park, Haleema Shakur आणि Caroline Free. घरी आणि क्लिनिकमध्ये वैद्यकीय गर्भपाताची तुलनात्मक परिणामकारकता, सुरक्षा आणि स्वीकृती: एक पद्धतशीर पुनरावलोकन. येथून मिळवली: https://www.who.int/bulletin/volumes/89/5/10-084046/en/

[6] Brooke Ronald Johnson, Vinod Mishra, Antonella Francheska Lavelanet, Rajat Khosla आणि Bela Ganatra. गर्भपात कायदे, धोरणे, आरोग्यविषयक मानके आणि मार्गदर्शक तत्त्वे यांचे जागतिक डेटाबेस आर्टिकल याचा अल्टमेट्रिक स्कोअर 221 आहे. येथून मिळवली: https://www.who.int/bulletin/volumes/95/7/17-197442/en/

[7] Webmd. मिसोप्रोस्टॉल. येथून मिळवली: https://www.webmd.com/drugs/2/drug-6111/misoprostol-oral/details

[8] WHO. आरोग्याच्या अधिकाराचा भाग म्हणून आवश्यक औषधांची उपलब्धता. येथून मिळवली: https://www.who.int/medicines/areas/human_rights/en/

[9] Ipas. मेडिकल गर्भपात कॉंट्राइंडिकेशन आणि सावधगिरी. येथून मिळवली: https://www.ipas.org/clinical-updates/general/ma-precautions

[10] WHO. आवश्यक औषधे यादी अप्लिकेशन–मेडिकल गर्भपातासाठी मिसोप्रोस्टॉल. येथून मिळवली: https://www.who.int/selection_medicines/committees/expert/22/applications/s22.1_mifepristone-misoprostol.pdf?ua=1

[11] Ipas. (2019). पुनरुत्पादात्मक आरोग्यामधील क्लिनिकल अद्यतने. L. Castleman & N. Kapp (Eds.). Chapel Hill, NC: Ipas. येथून मिळवली: https://ipas.azureedge.net/files/CURHE19-april-ClinicalUpdatesInReproductiveHealth.pdf

[12] नॅशनल अबॉर्शन फेडरेशन. 2020 गर्भपाताच्या देखभालीसाठी क्लिनिकची धोरण मार्गदर्शकतत्त्वे. येथून मिळवली: https://5aa1b2xfmfh2e2mk03kk8rsx-wpengine.netdna-ssl.com/wp-content/uploads/2020_cpgs_final.pdf

[13] नियोजित पालकत्व गर्भपाताची गोळी कसे कार्य करते? येथून मिळवली: https://www.plannedparenthood.org/learn/abortion/the-abortion-pill/how-does-the-abortion-pill-work

[14] Gynuity. स्वतः घेतलेल्या मिसोप्रोस्टॉलद्वारे गर्भपात. येथून मिळवली: https://gynuity.org/assets/resources/polbrf_misoprostol_selfguide_en.pdf

[15] BPAS. आपल्या गर्भपातानंतर स्वतःची काळजी घेणे. येथून मिळवली: https://www.bpas.org/abortion-care/abortion-aftercare

Last updated on 10/02/2021