गर्भपाताच्या गोळ्या स्थानिक ठिकाणी कशा शोधाव्यात

आपण कोणत्या देशात आहात त्यानुसार गर्भपाताच्या गोळ्या मिळवण्याचे अनेक मार्ग असू शकतात. आपण कोणत्या देशात आहात हे आपण आम्हाला सांगितल्यास, आम्ही आपल्याला गर्भपाताच्या गोळ्या मिळवण्याचे आणि सुरक्षित गर्भपात करण्याचे पर्याय देऊ शकतो. आमच्याशी संपर्क साधा जेणेकरून आम्ही समजावू शकतो की सुरक्षित गर्भपातापर्यंत कसे पोहोचता येईल.

आपण स्थानिक ठिकाणी गर्भपाताच्या गोळ्या शोधण्याचा विचार करत असाल तर, आम्ही आपल्यासह काही महत्त्वाच्या गोष्टी सामायिक करू इच्छितो.

काहीवेळा स्थानिक ठिकाणी गोळ्या शोधणे कठीण होऊ शकते कारण आपल्याला त्यांच्या गुणवत्तेची किंवा त्या खर्‍या आहेत की नाही याची खात्री नसते. तसेच, त्या खूप महाग असतात. गर्भपाताच्या गोळ्या शोधताना विचार करण्यासारख्या काही टिपा खाली दिल्या आहेत.

स्थानिक ठिकाणी मिफेप्रिस्टोन शोधणे

आपण मिफेप्रिस्टोन स्थानिक ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करत असल्यास, आपल्याला काही अडचणी येऊ शकतात. मिफेप्रिस्टोन मुख्यतः गर्भपात किंवा नैसर्गिक गर्भपातासाठी वापरले जाते आणि ते बर्‍याच देशांमध्ये नोंदणीकृत नाही, खासकरून त्या देशांमध्ये जिथे सुरक्षित गर्भपातावर कायदेशीरपणे बंदी आहे. त्यामुळे ते मिळवणे कठीण होऊ शकते, फार्मसी मधून देखील. [1]

याचा अर्थ जास्तकरून जेव्हा आपल्याला अनौपचारिक बाजारात मिफेप्रिस्टोन मिळते तेव्हा ते खरे नसू शकते.

केवळ गोळीकडे बघून ती खरी आहे की नाही हे समजण्याचा आमच्याकडे किंवा आपल्याकडे कोणताच मार्ग नाही. याचे कारण असे की तिचे अनेक ब्रॅंड आणि त्यामुळे अनेक वेगवेगळे आकार, साइझ आणि शेड आहेत. खात्रीपूर्वक जाणून घेण्याचा एकाच मार्ग आहे, तो म्हणजे जर मिफेप्रिस्टोन त्याच्या मूळ पॅकेजमध्ये असेल. तसे असल्यास, एक्सपायरेशन तारीख तपासा. [2]

आपल्याला मिफेप्रिस्टोन मिळाल्यास, हे लक्षात ठेवा की ती सामान्यतः एका मेडिकल व्यावसायिकाद्वारे प्रिस्क्राइब केली जाते आणि आपल्याला सुरक्षित गर्भपात करण्यासाठी 200 mg ची केवळ 1 गोळी पुरेशी आहे. [3]

काहीवेळा आपल्याला मिळालेल्या गोळ्यांचा डोस (mg) वेगळा असेल, त्यामुळे आपल्याला गोळ्यांची संख्या पुन्हा मोजावी लागेल. उदाहरणार्थ, आपल्याला केवळ या गोळ्या मिळाल्यास:

– 10 mg, आपल्याला 200 mg च्या पूर्ण डोसपर्यंत पोहोचण्यासाठी 20 गोळ्यांची गरज असेल.

– 50 mg, आपल्याला 200 mg च्या पूर्ण डोसपर्यंत पोहोचण्यासाठी 4 गोळ्यांची गरज असेल.

– 100 mg, आपल्याला 200 mg च्या पूर्ण डोसपर्यंत पोहोचण्यासाठी 2 गोळ्यांची गरज असेल.

– etcy6

स्थानिक ठिकाणी मिसोप्रोस्टॉल शोधणे

मिसोप्रोस्टॉल स्थानिक ठिकाणी शोधणे सोपे असते कारण बर्‍याच देशांमध्ये ती पोटाचे अल्सर, प्रसूती सुरू करणे किंवा प्रसूतीनंतरचा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी नोंदणीकृत आहे. काही देशांमध्ये, आपल्याला ती फार्मसीमध्ये प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळू शकते. [4]

मिसोप्रोस्टॉलची अनेक ब्रॅंड नावे आहेत. काहीवेळा आपल्याला खालील नावांनी हे औषध मिळेल: सायटोटेक,सायप्रोस्टोल, मिसोट्रोल, प्रोस्टोकोस, वेगीप्रोस्ट, मिसोटॅक, मिझोप्रोटोल, मिसोफार, आयसोवेंट, कॉन्ट्रॅक, सायटोपॅन, नोप्रोस्टोल, गॅस्ट्रूल, क्रोमेलक्स, असोटेक, सायरुक्स, सिटिल, मिसोप्रोलेन, मिबेटेक, सायटोमिस, मायक्लोफेनाक, मिसोक्लो, मिसोफेन, मिसोगोन, अल्सोबेन, मिसेल, सीनटेक, गॅस्ट्रोटेक, सिस्टोल, गॅस्टेक, सिरोटेक, गिस्टोल, मिसोप्लस, झिटोटेक, प्रेस्टाकाइंड, मिसोप्रोस्ट, सायटोलोग, जीमिसोप्रोस्टॉल, मिरोलूट, जीमिसो, ऑक्साप्रोस्ट

आपल्याला अशी गोळी प्रिस्क्राइब केली जाऊ शकते ज्यामध्ये डायक्लोफेनेकसह मिसोप्रोस्टॉल असेल, जोपर्यंत मिसोप्रोस्टॉलचा डोस 200mg असेल. हे औषध ऑक्साप्रोस्ट, ऑक्साप्रोस्ट 75 किंवा अर्थ्रोटेक अशा नावांमध्ये उपलब्ध आहे. हे वापरण्याबद्दल अधिक माहितीसाठी, FAQs विभाग पहा आणि गरज असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

आपण गर्भपात करण्यासाठी केवळ मिसोप्रोस्टॉल वापरणार असल्यास, आपल्याला आपल्या गर्भधारणेच्या अंदाजित वयाच्या आधारावर एकूण 8-12 गोळ्या प्रिस्क्राइब केल्या जातील. जेव्हा शक्य असेल तेव्हा, 12 गोळ्या घेण्यास प्राधान्य देण्यात येते.

मूळ पॅकेजमध्ये असलेल्या गोळ्या शोधणे सर्वोत्तम आहे, पण हे शक्य नसल्यास गोळ्या तपासण्याची खात्री करा. त्या विरघळत नाहीत याची खात्री करण्यासाठी त्यांना स्पर्श करा आणि त्या सर्व एकसारख्या दिसतात की नाही हे तपासा. त्या मूळ पॅकेजमध्ये असल्यास त्यांची एक्सपायरेशन तारीख तपासण्याची देखील खात्री करा.

आपण गर्भपाताच्या गोळ्या स्थानिक ठिकाणी शोधण्याआधी, कृपया गर्भपाताशी संबंधित स्थानिक कायदे, गर्भपाताच्या गोळ्यांचा वापर आणि अशा गर्भपाताच्या गोळ्या खरेदी करण्याआधी आणि वापरण्याआधी पात्र नोंदणीकृत मेडिकल व्यवसायिकांच्या प्रिस्क्रिप्शनच्या कोणत्याही आवश्यकतांबद्दल वाचा आणि स्वतःला परिचित करून घ्या. safe2choose याबाबतच्या कोणत्याही उल्लंघनांसाठी बांधील किंवा जबाबदार राहणार नाही.

आपल्या हद्दीतील आम्ही एकत्रित केलेल्या मेडिकल व्यावसायिक आणि गर्भपात क्लिनिकच्या यादीसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा. कोणत्याही व्यावसायिक किंवा क्लिनिकची निवड करण्याआधी कृपया पूर्ण माहिती करून घ्या. ही माहिती आपल्या सोयीसाठी आहे आणि आमच्याद्वारे स्वतंत्रपणे तपासून पाहिलेली नाही. अशा माहितीच्या सत्यतेबद्दल किंवा अचूकतेबद्दल आम्ही जबाबदार नाही.

गोळ्या कशा वापराव्यात याबद्दल सूचना

विविध ठिकाणी गोळ्या शोधताना, उदाहरणार्थ मग तो अनौपचारिक बाजार असो किंवा फार्मसी किंवा डॉक्टर, आपल्याला गोळ्या कशा वापराव्यात याबद्दल परस्परविरोधी सूचना मिळू शकतात.

बरेच विक्रेते योग्यरीत्या प्रशिक्षित नसतात आणि गर्भपाताच्या गोळ्या कशा वापराव्यात याबद्दल त्यांना योग्य माहिती नसते. त्यापैकी काही फक्त पैशासाठी गर्भपाताच्या गोळ्या विकतात, महिलांना समर्थन देण्यासाठी नाही. गर्भपाताच्या गोळ्या घेण्याआधी, आपण मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टॉल किंवा केवळ मिसोप्रोस्टॉल वापरुन गर्भपात करण्यावरचे आमचे ऑनलाइन प्रोटोकॉल तपासून किंवा आमच्याशी संपर्क साधा येथे आमच्या समुपदेशकांना संदेश लिहून आपण योग्य सूचनांचे पालन करत आहात याची खात्री करून घेऊ शकता.

फार्मसी आणि डॉक्टर देखील गोळ्या कशा वापरायच्या याबद्दल चुकीची माहिती देऊ शकतात. गर्भपातावर असलेले निर्बंध आणि गर्भपात बर्‍याच ठिकाणी सामाजिकपणे स्वीकारलेला नसल्याने मेडिकल स्टाफदरम्यान सुद्धा खोट्या आणि चुकीच्या माहितीचे वातावरण तयार होते.

वैज्ञानिक अभ्यासांवर आधारित आणि जागतिक आरोग्य संस्थांद्वारे मान्यता मिळालेल्या विश्वासार्ह सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. आपण बरीच वेगवेगळी माहिती वाचली असल्यास, आमच्याशी संपर्क साधा जेणेकरून आम्ही आपल्या शंकांचे निरसन करू शकू आणि आपल्याला विश्वासार्ह माहिती देऊ शकू. [5]

हे लक्षात ठेवा की आपल्याला समर्थन देण्यासाठी safe2choose आहे.

आमचे समुपदेशक महिलांच्या हक्कांबाबत सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोनासह व्यावसायिकरित्या प्रशिक्षित आहेत जेणेकरून ते आपल्याला गोळ्यांद्वारे केल्या जाणार्‍या गर्भपाताबद्दल आणि गोळ्या वापरण्याच्या योग्य सूचनांबद्दल मदत आणि माहिती प्रदान करू शकतील. आम्ही नेहमी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइझेशन (WHO) मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करतो. आवश्यक असल्यास, आम्ही आपली विश्वसनीय संस्थांना शिफारस करू शकतो ज्या आपल्याला गर्भपाताच्या गोळ्या किंवा त्याबद्दल स्थानिक माहिती मिळवण्याबाबत मदत करतील. [3]


स्त्रोत

[1] Gynuity. मिफेप्रिस्टोन मंजुरी. येथून मिळवली: https://gynuity.org/assets/resources/biblio_ref_lst_mife_en.pdf.

[2] IPPF. नोंदणीकृत मिफेप्रिस्टोन ब्रॅंड. येथून मिळवली: https://www.medab.org/advanced-search-multiple-results?country=all&commodity=100&brand=all#multiple-search-result

[3] वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइझेशन. सुरक्षित गर्भपात: स्वास्थ्य प्रणाल्यांसाठी तांत्रिक आणि धोरण मार्गदर्शक. येथून मिळवली: https://apps.who.int/iris/bitstream/handle/10665/70914/;jsessionid=B7AEEBE4F34809D869F73B1ABA7F6221?sequence=1

[4] WHO. आवश्यक औषधे यादी अॅप्लिकेशन–मेडिकल गर्भपातासाठी मिसोप्रोस्टॉल. येथून मिळवली: https://www.who.int/selection_medicines/committees/expert/22/applications/s22.1_mifepristone-misoprostol.pdf?ua=1

[5] Ipas. (2019). पुनरुत्पादात्मक आरोग्यामधील क्लिनिकल अद्यतने. L. Castleman & N. Kapp (Eds.). Chapel Hill, NC: Ipas. येथून मिळवली: https://ipas.azureedge.net/files/CURHE19-april-ClinicalUpdatesInReproductiveHealth.pdf

Last updated on 10/02/2021