गर्भपातासाठी सायटोटेक: आपल्याला माहीत असायला हवे असे सर्वकाही

बाजारामध्ये अनेक प्रकारच्या विविध गर्भपाताच्या गोळ्या आहेत आणि त्यांची उपलब्धता जगभरात वेगळी आहे. या गोळ्यांमधील सर्वसामान्य गोळी सायटोटेक आहे. सायटोटेक कसे काम करते, तिची किंमत काय आहे, डोस काय आहे, ती कुठे मिळेल याबद्दल आपण जाणू इच्छित असल्यास, ही मार्गदर्शिका उपयुक्त ठरेल अशी आम्ही आशा करतो. आपल्याला अतिरिक्त प्रश्न असल्यास, कृपया ईमेल किंवा लाईव्ह चॅटद्वारे आमच्या एका समुपदेशकाशी संपर्क साधा आणि आम्ही नक्कीच आपल्याला समर्थन देऊ.

सायटोटेक गर्भपाताची गोळी काय आहे ?

image of cytotec pill packaging

Photo credit: Cytotec. Flickr

image of hexagonal cytotec pill

Photo credit: Cytotec. Flickr

image of circular cytotec pill

Photo credit: Cytotec. Flickr

सायटोटेक ही 11 आठवड्यांपर्यंतच्या गर्भधारणांच्या गर्भपातासाठी वापरण्यात येणारी गोळी आहे. हे एक प्रोस्टाग्लांडीन औषध आहे, याचाच अर्थ गर्भधारणेदरम्यान वापरल्यावर यामुळे गर्भाशयग्रीवा मऊ होते आणि मोठी होते आणि गर्भाशयाचे आकुंचन होते. हे Pfizer औषधोत्पादन कंपनीद्वारे उत्पादित केले जाते. [1]

सायटोटेक गर्भपातासाठी कसे काम करते?

सायटोटेक गर्भाशयग्रीवा मऊ आणि मोठी करून काम करते आणि गर्भाशयाचे आकुंचन करते. या क्रियांमुळे गर्भ बाहेर पडायला मदत होते. सामान्यतः ही वापरल्यावर ~1 तासामध्ये परिणाम करायला लागते, पण याला अधिक वेळ सुद्धा लागू शकतो. [2]

सायटोटेकचा डोस किती आहे?

सामान्यतः सायटोटेक 200mcg च्या गोळ्यांमध्ये मिळते आणि गर्भधारणा किती वाढली आहे यावर तिच्या डोसची शिफारस बदलते.

9 आठवड्यांहून कमी काळाच्या गर्भधारणेसाठी, शिफारस केलेला सायटोटेकचा डोस आहे 800mcg चे 2 सेट (एकूण 1600mcg किंवा 8 गोळ्या).
9-11 आठवड्यांमधील गर्भधारणेसाठी, शिफारस केलेला सायटोटेकचा उपलब्ध डोस आहे 800mcg चे 3 सेट (एकूण 2400mcg किंवा 12 गोळ्या). [3]

6 आठवड्यांखालील गर्भधारणेसाठी सायटोटेकचा डोस किती आहे?

6 आठवडे किंवा त्याहून कमी काळाच्या गर्भधारणेसाठी, शिफारस केलेला सायटोटेकचा डोस आहे 800mcg चे 2 सेट (एकूण 1600mcg किंवा 8 गोळ्या). काही केसेसमध्ये वापरासाठी 800mcg (4 गोळ्यांचा) अतिरिक्त सेट सोबत ठेवण्याची सुद्धा शिफारस केली जाते. [3]

9 आठवड्यांखालील गर्भधारणेसाठी सायटोटेकचा डोस किती आहे?

9 आठवड्यांहून कमी काळाच्या गर्भधारणेसाठी, शिफारस केलेला सायटोटेकचा डोस आहे 800mcg चे 2 सेट (एकूण 1600mcg किंवा 8 गोळ्या). काही केसेसमध्ये वापरासाठी 800mcg (4 गोळ्यांचा) अतिरिक्त सेट सोबत ठेवण्याची सुद्धा शिफारस केली जाते. [3]

9 ते 11 आठवड्यांमधील गर्भधारणेसाठी सायटोटेकचा डोस किती आहे?

9 ते 11 आठवड्यांमधील गर्भधारणेसाठी, शिफारस केलेला सायटोटेकचा उपलब्ध डोस आहे 800mcg चे 3 सेट (एकूण 2400mcg किंवा 12 गोळ्या). [3]

सायटोटेकची किंमत किती आहे?

सायटोटेकची किंमत बरेचदा खूप कमी असते पण भौगोलिक स्थानानुसार ती बदलत जाईल. वेगवेगळ्या देशांमध्ये गर्भपाताचे वेगवेगळे नियम असतात आणि यामुळे सायटोटेकच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो. असे शक्य आहे की गर्भपातावर कायदेशीर निर्बंध असणार्‍या देशांमध्ये प्रिस्क्रिप्शनशिवाय सायटोटेकची किंमत महाग असू शकते.

अशा संस्था आहेत ज्या दान म्हणून गोळ्या पाठवू शकतात, आपण गोळ्या मिळवण्याबद्दल अधिक माहितीसाठी Women on Web आणि Women Help Women तपासू शकता. [4]

सायटोटेक कशी घ्यावी

safe2choose सायटोटेकला जिभेखाली ठेऊन किंवा सबलिंगुअलपद्धतीने घ्यायची शिफारस करते. हे घेण्याची सर्वात उत्तम पद्धत आहे सायटोटेक गोळ्यांना थेट जिभेखाली ठेवावे आणि त्यांना तिथे 30 मिनिटे विरघळू द्यावे. 30 मिनिटांनंतर उरलेल्या गोळ्या पाण्यासह गिळल्या जाऊ शकतात.

(800mcg) सायटोटेकचा पहिला डोस घेतल्यानंतर 3 तासांनी तशाच प्रकारे पुढचा डोस घ्यावा. प्रोटोकॉलमध्ये तिसरा डोस दर्शवला असल्यास, तो दुसर्‍या डोस नंतर 3 तासांनी घ्यावा. [3]

सायटोटेकचे विपरीत परिणाम काय आहेत

गर्भपातासाठी वापरल्यावर, सायटोटेकचे अपेक्षित परिणाम आहेत पोटदुखी आणि रक्तस्त्राव होणे. या परिणामांसह, मळमळ, उल्टी, जुलाब, ताप आणि थंडी असे विपरीत परिणाम जाणवू शकतात.

सामान्यतः हे परिणाम 24 तासांपूर्ते मर्यादित असतात. [4]

सायटोटेक गर्भपाताच्या गोळ्या कशा दिसतात?

सायटोटेक 200mcg टॅबलेट या लहान, पांढर्‍या, षटकोनी आकाराच्या गोळ्या असतात. त्यांना मधून भेग असते आणि त्यांच्यावर “searle” आणि/किंवा “1461” कोरलेले असते. [5]

सायटोटेक गर्भपाताच्या गोळ्या कशा मिळवाव्यात?

सायटोटेक गर्भपाताच्या गोळ्यांची उपलब्धता भौगोलिक स्थानाच्या आधारावर बदलत असते. सायटोटेक पोटाच्या अल्सरसाठी सुद्धा दिली जाते, त्यामुळे काहीवेळा ती दुकानामध्ये प्रिस्क्रिप्शनशिवाय देखील मिळू शकते. तसे असल्यास, सायटोटेक आपल्या स्थानिक फार्मसीमध्ये पोटाच्या औषधांजवळ मिळू शकते. ते तिथे न सापडल्यास, अशी शक्यता आहे की तिला फार्मसीमधून घेण्यासाठी प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता आहे.

या देशांमध्ये सायटोटेक उपलब्ध आहे याची पडताळणी केलेली आहे [7]:
अर्मेनिया, ऑस्ट्रेलिया, अझर्बाइजान, बेल्जियम, बेलिझ, बेनीन, बोलिविया, बुर्किना फासो, कंबोडिया, कॅमरून, केप वर्डे, चीन, आयव्हरी कोस्ट, डेम. काँगो चे प्रजासत्ताक, डोमिनिकन रिपब्लीक, इक्वाडोर, इजिप्त, एल साल्वाडोर, गॅबॉन, गॅम्बिया, जॉर्जिया, घाना, ग्वाटेमाला, गिनी, गुयाना, हैती, इंडोनेशिया, केनिया, किर्गिस्तान, लेबनॉन, लिथुआनिया, मलावी, माली, मेक्सिको, मोरोक्को, म्यानमार, नायजर, नायजेरिया, पराग्वे, पेरू, रवांडा, सिएरा लिओन, दक्षिण आफ्रिका, थायलंड, टोगो, ट्युनिशिया, तुर्की, युगांडा, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स, उझबेकिस्तान, झांबिया

ही वेबसाइट आपल्या स्थानामध्ये सायटोटेकची उपलब्धता शोधण्यामध्ये देखील उपयुक्त असू शकते. [6]

आपण आमच्या समुपदेशकांशी देखील संपर्क साधू शकता, आणि ते आपल्याला आपल्या जवळपासच्या विश्वासू प्रदात्याशी संपर्क साधण्यासाठी मदत करतील.

लेखक:

by the safe2choose टीम आणि कॅराफेम मधील समर्थन देणार्‍या तज्ञांद्वारे, द नॅशनल अबॉर्शन फंड (NAF) यांच्या 2020 च्या शिफारसी आणि Ipas च्या 2019 च्या शिफारसींवर आधारित.

द नॅशनल अबॉर्शन फंड (NAF) ही उत्तर अमेरिकेतील गर्भपात सुविधा पुरवणार्‍या प्रदात्यांची व्यावसायिक संस्था आहे.

कॅराफेम एक सोयिस्कर आणि व्यावसायिक गर्भपात आणि कुटुंब नियोजन सेवा प्रदान करते ज्यामुळे लोक त्यांच्या मुलांची संख्या आणि त्यांच्यामधील अंतर नियंत्रित करू शकतात.

Ipas ही एकमेक अंतरराष्ट्रीय संस्था आहे जिचा एकमेव हेतु सुरक्षित गर्भपात आणि गर्भनिरोधक देखभालीची उपलब्धता वाढवणे आहे


स्त्रोत

[1] अपटुडेट. गर्भधारणेच्या वैद्यकीय समाप्तीसाठी एकच एजंट म्हणून मिसोप्रोस्टॉल. येथून मिळवली: https://www.uptodate.com/contents/misoprostol-as-a-single-agent-for-medical-termination-of-pregnancy?search=cytotec&source=search_result&selectedTitle=2~117&usage_type=default&display_rank=1#H2428459676

[2] Allen R, O’Brien BM. प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्रात मिसोप्रोस्टॉलचा वापर. Rev Obstet Gynecol. 2009;2(3):159–168. येथून मिळवली: https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2760893/

[3] Ipas. (2019). पुनरुत्पादात्मक आरोग्यामधील क्लिनिकल अद्यतने. L. Castleman & N. Kapp (Eds.). Chapel Hill, NC: Ipas. येथून मिळवली: https://ipas.azureedge.net/files/CURHE19-april-ClinicalUpdatesInReproductiveHealth.pdf

[4] अपटुडेट. मिसोप्रोस्टॉल: औषधाची माहिती. येथून मिळवली: https://www.uptodate.com/contents/misoprostol-drug-information?search=cytotec&source=panel_search_result&selectedTitle=1~117&usage_type=panel&kp_tab=drug_general&display_rank=1#F197173

[5] WebMD. औषधे आणि औषधोपचार: सायटोटेक. येथून मिळवली: https://www.webmd.com/drugs/2/drug-1786/cytotec-oral/details

[6] विमेन ऑन वेव्स. नकाशावरील देश. येथून मिळवली: https://www.womenonwaves.org/en/map/country

[7] IPPF. वैद्यकीय गर्भपाताच्या वस्तूंचा डेटाबेस. येथून मिळवली: https://www.medab.org/advanced-search-multiple

Last updated on 11/02/2021