अटी आणि शर्ती

सामान्य

safe2choose (www.safe2choose.org) कडे या वेबसाइटचे मालकत्व आहे आणि तेच ही वेबसाइट चालवतात. हे दस्तावेज आपला डोमेन नाव www.safe2choose.org आणि त्याचे सेवा प्रदाते (“वेबसाइट”) यांच्यासह असलेला संबंध प्रशासित करते. या वेबसाइटचा ऍक्सेस आणि वापर आणि माहिती – प्रतिमा, मजकूर आणि व्हीडीओ- आणि सेवा – या वेबसाइट वर उपलब्ध असलेल्या -समुपदेशन आणि ऑनलाइन समुपदेशना समवेत (एकत्रितपणे “समुपदेशन सेवा / सेवा म्हणून संबोधित) हे खालील अटी, शर्ती आणि सूचनांना आधीन आहेत (“सेवा शर्ती”).

या वेबसाइटवर किंवा या वेबसाइटद्वारे या समुपदेशन सेवा वापरुन, आपण सर्व सेवा शर्तिंसह सहमत व्हाल, ज्या वेळोवेळी आमच्याद्वारे अद्यतनीत होतील. आम्ही सेवा शर्तींमध्ये केलेले कोणतेही बादल पाहण्यासाठी आपण हे पृष्ठ नियमितपणे तपासले पाहिजे. वेबसाइट किंवा तिच्या सेवा शर्तींमध्ये केलेल्या बदलांबद्दल आपल्याला आगाऊ सूचना देणे आम्हाला कदाचित शक्य होणार नाही.

आम्हाला सूचना न देता सेवा सुधारण्याचा किंवा मागे घेण्याचा हक्क आहे. कोणत्याही वेळी किंवा कितीही काळासाठी ही वेबसाइट अनुपलब्ध राहिल्यास आम्ही कोणतेही कारण देण्यास बांधील नाही. वेळोवेळी, या वेबसाइटच्या काही भागांचा किंवा संपूर्ण वेबसाइटचा ऍक्सेस आम्ही प्रतिबंधित करू शकतो.

या वेबसाइटमध्ये इतर वेबसाइटच्या (“लिंक केलेल्या साइट”) लिंक असू शकतात ज्यांना ही वेबसाइट चालवत नाही. या वेबसाइटचे लिंक केलेल्या साइटवर कोणतेही नियंत्रण नाही आणि त्यांच्याबद्दल किंवा आपण त्यांना वापरल्यामुळे आपल्याला होणार्‍या नुकसानाबद्दल कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही. आपला यापैकी प्रत्येक साइटचा वापर हा त्या वेबसाइटच्या सेवा आणि वापर शर्तींवर अवलंबून असेल.

गोपनीयता धोरण

आमचे गोपनीयता धोरण, जे हे स्पष्ट करते की आम्ही आपली माहिती काशी वापरू, ते येथे मिळेल www.safe2choose.org/mr/gopniyata-dhoran/. ही वेबसाइट वापरुन, आपण आपल्या वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करण्यास अनुमति देता आणि या गोष्टीची पुष्टी करता की आपल्याद्वारे देण्यात येणारा सर्व डेटा अचूक आहे.

समुपदेशक आणि समुपदेशन सेवा

ही वेबसाइट आपल्याला समुपदेशन, माहिती आणि मेडिकल गर्भपाताबद्दल सल्ला विचारण्यासाठी समुपदेशक, सल्लागार, पॅनलमधील मेडिकल प्रॅक्टिशनर आणि डॉक्टर किंवा सेवा देण्यासाठी पात्र असलेल्या इतर कोणत्याही व्यक्तिला (एकत्रितपणे “समुपदेशक” म्हणून संबोधित) संपर्क करू देते. कृपया याबद्दल जागरूक रहा की या समुपदेशन सेवा या व्यावसायिक मेडिकल सल्ला किंवा व्यावसायिक मेडिकल सेवा नाहीत आणि आपल्या स्थानिक क्षेत्राच्या कायद्यांअंतर्गत असे सल्ले किंवा सेवा देण्यास पात्र असलेल्या नोंदणीकृत मेडिकल प्रॅक्टिशनरच्या सल्ल्याचा आणि सेवांचा पर्याय समजू नये. ही वेबसाइट कोणत्याही स्थानिक क्षेत्रांच्या कायद्यांअंतर्गत मेडिकल प्रॅक्टिशनर किंवा क्लिनिक म्हणून नोंदणीकृत नाही, त्यांच्या सेवांबद्दल कोणतीही प्रतिनिधीत्वे करत नाहीत किंवा हमी देत नाहीत आणि कोणतेही उपचार किंवा औषधे प्रिस्क्राइब करण्यास पात्र नाहीत. वेबसाइट किंवा समुपदेशकांना हॉस्पिटल, क्लिनिक, मेडिकल स्थापना किंवा मेडिकल प्रॅक्टिशनरचा दर्जा देऊ नये.

ही वेबसाइट निदान, औषधांचे प्रिस्क्रिप्शन किंवा आपल्याला योग्य असलेले उपचार करण्याच्या हेतूने बनवलेली नाही आणि वेबसाइटद्वारे अशी कोणतीही माहिती मिळाल्यास आपण तिच्याकडे दुर्लक्ष करावे.

वेबसाइटवरील या समुपदेशन सेवा केवळ नोंदणीकृत/परवानाधारक मेडिकल प्रॅक्टिशनरसह केलेल्या प्रत्यक्ष भेटीइतक्या पूरक आहेत आणि या समुपदेशन सेवा परवानाधारक पात्र मेडिकल डॉक्टरसह होणार्‍या प्रत्यक्ष भेटीचा आणि/किंवा सेशनचा पर्याय नाही. त्याही पुढे, सर्व केसमध्ये मेडिकल गर्भपातासह पुढे जाण्याआधी किंवा इतर कोणत्याही गर्भपात पद्धतींना प्राधान्य देण्याआधी आपण परवानाधारक आणि पात्र मेडिकल प्रॅक्टिशनरसह प्रत्यक्ष भेट निश्चित करून सल्ला घ्यावा. समुपदेशन सेवा आपल्याला केवळ मेडिकल गर्भपाताच्या वेगवेगळ्या पर्यायांबद्दल सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेली माहिती देतात आणि यापैकी कोणती पद्धत आपल्यासाठी योग्य आहे याबद्दल कोणतेही सल्ले किंवा शिफारसी देत नाहीत.

आपल्याला आमच्याद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारावर आपण कधीही आपले डॉक्टर किंवा इतर पात्र आरोग्य सेवा व्यावसायिक यांच्याकडून प्रत्यक्ष मिळणारा मेडिकल सल्ला खारीज, दुर्लक्षित किंवा मिळवण्यात उशीर करू नये.

कोणतेही उपचार, प्रोटोकॉल किंवा औषधे घेण्याआधी आपण सर्व केसमध्ये आपल्या स्थानिक क्षेत्रामध्ये मेडिकल सल्ला देण्यासाठी नोंदणीकृत असलेल्या मेडिकल प्रॅक्टिशनरचा सल्ला घ्यावा.

मनाई

आपण या वेबसाइटचा गैरवापर करू नये. आपण यापैकी काहीही करणार नाही: फौजदारी गुन्हा करणे किंवा त्यास प्रोत्साहन देणे; वायरस, ट्रोजन, वर्म, लॉजिक बॉम्ब किंवा इतर कोणतीही सामग्री जी दुर्भावनायुक्त, तांत्रिकदृष्ट्या हानिकारक, विश्वासघात कणारी किंवा कोणत्याही प्रकारे आक्षेपार्ह किंवा अश्लील असेल ती पसरवणे; सेवेचा कोणताही पैलू हॅक करणे; डेटा करप्ट करणे; इतर वापरकर्त्यांना त्रास देणे; इतर कोणत्याही व्यक्तीच्या मालकी हक्कांचे उल्लंघन करणे; कोणतीही अवांछित जाहिरात किंवा जाहिरात सामग्री पाठवणे, ज्याला सामान्यतः “स्पॅम” म्हणतात; किंवा या वर असलेल्या किंवा याद्वारे अॅक्सेस करण्यात येणार्‍या कोणत्याही कम्प्युटर सुविधांच्या कार्यप्रदर्शन किंवा कार्यक्षमतेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणे. या तरतुदीचा भंग केल्यास हा फौजदारी गुन्हा ठरेल आणि वेबसाइट संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांना अशा कोणत्याही उल्लंघनाचा रीपोर्ट देईल आणि त्यांना आपली ओळख जाहीर करेल.

आपल्या या वेबसाइटच्या वापरामुळे किंवा आपण येथे किंवा येथे लिंक असलेल्या कोणत्याही वेबसाइटवर पोस्ट केलेली कोणतीही सामग्री डाऊनलोड केल्यामुळे किंवा डिस्ट्रिब्युटेड डीनायल-ऑफ-सर्विस अटॅक, वायरस किंवा इतर तांत्रिकदृष्ट्या हानिकारक सामग्री जी आपल्या कम्प्युटर साधन, कम्प्युटर प्रोग्राम, डेटा किंवा इतर मालकीचे साहित्य इंफेक्ट करू शकते अशा कोणत्याही कारणांमधून उद्भवणार्‍या कोणत्याही नुकसानासाठी किंवा हानीसाठी आम्ही जबाबदार असणार नाही.

बौद्धिक मालमत्ता, सॉफ्टवेअर आणि सामग्री

आपल्याला या वेबसाइटवर किंवा याद्वारे ऊपलब्ध असणारे कोणतेही सॉफ्टवेअर आणि सामग्रीचे (फोटोग्राफिक प्रतिमांसह) बौद्धिक मालमत्ता हक्क ही वेबसाइट किंवा त्यांचे परवानादाता यांची मालमत्ता आहे आणि जगभरात कॉपीराइट कायदे आणि करारांद्वारे संरक्षित आहे. असे सर्व अधिकार वेबसाइट आणि त्यांच्या परवानादात्यांद्वारे आरक्षित आहेत. पुरवलेली सामग्री आपण आपल्या वैयक्तिक वापरासाठी संग्रहीत, प्रिंट आणि प्रदर्शित करू शकता. या वेबसाइटवर उपलब्ध असलेली कोणतीही सामग्री जाहीर किंवा त्यात बादल करण्याची किंवा ती वाटण्याची आपल्याला परवानगी नाही किंवा आपण कोणत्याही व्यवसाय किंवा व्यावसायिक एंटरप्राइझच्या संदर्भात अशी कोणतीही सामग्री वापरू शकत नाही.

ऑनलाइन समुपदेशन सेवांच्या अटी आणि शर्ती

समुपदेशन सेवा ही मेडिकल गर्भपाताचा विचार करणार्‍या किंवा मेडिकल गर्भपाताबद्दल काही प्रश्न असणार्‍या महिलांना दिली जाणारी ऑनलाइन सेवा आहे. समुपदेशन सेवा मानवी हक्कांवरी]ल आंतरराष्ट्रीय कराराची सदस्यता घेते जिथे जगण्याचा, आरोग्य, माहिती, गोपनीयता आणि वैज्ञानिक प्रगतीमधून लाभाचा हक्क संरक्षित आहे. आमच्या समुपदेशन सेवांना खालील शर्ती लागू होतात :

 • आम्ही केवळ त्या महिलांना गोळ्यांद्वारे केल्या जाणार्‍या सुरक्षित गर्भपाताबद्दल माहिती देतो ज्यांना आपली गर्भधारणा संपवायची असते आणि आमच्या सेवांचा उद्देश गर्भपातास प्रोत्साहन देणे किंवा त्याचा प्रचार करणे असा समजू नये.
 • आम्ही मेडिकल गर्भपातासाठी कोणतीही औषधे किंवा सुविधा देत नाही.
 • मेडिकल गर्भपात हा अनेक क्षेत्रांच्या स्थानिक कायद्यांद्वारे नियमबद्ध केलेला असतो आणि आपण आपली गर्भधारणा मेडिकल पद्धतीने संपवण्याचा निर्णय घेण्याआधी आपण आपल्याला लागू असणारे स्थानिक कायदे वाचले आहेत आणि समजून घेतले आहेत याची आपण पुष्टी केली पाहिजे. आपणास येथे मेडिकल गर्भपातावरील स्थानिक कायद्यांचा एकत्रित सारांश मिळेल. ही माहिती आपल्या समजुतीसाठी दिली गेली आहे आणि कदाचित अद्यतनित केलेली नसेल. आम्ही तिच्या अचूकतेचे कोणतेही प्रतिनिधित्व करत नाही आणि ही माहिती कायदेशीर सल्ल्यासाठी पर्याय समजू नये. आपण यापुढे हे समजून घेता आणि कबूल करता की वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या समुपदेशन सेवा जागतिक आधारावर प्रदान केल्या आहेत आणि आपल्याला सल्ला देताना आपल्या स्थानिक कायद्यांविषयी आपल्याला माहिती देणे आमच्यासाठी अशक्य आहे आणि काही बाबतीत वेबसाइटद्वारे प्रदान केलेली माहिती आपल्या क्षेत्रात सामान्यतः प्रचलित असणार्‍या स्थानिक कायद्यांसह किंवा मेडिकल सल्ल्यासह विसंगत असू शकते. अशा केसमध्ये, आपण आमच्या समुपदेशकांनी दिलेली माहिती ही स्थानिक कायद्यांद्वारे निश्चित केलेली मानके किंवा आपल्या स्थानिक सरकार आणि मेडिकल प्रॅक्टिशनरनी जारी केलेल्या सल्ल्यांसह तपासून पहावी आणि केसप्रमाणे अशी मानके / सल्ले किंवा सल्ल्याचे अनुसरण करावे.
 • आपल्यास लागू असलेल्या स्थानिक कायद्यांनुसार मेडिकल गर्भपाताची माहिती मिळविण्याबाबत काही कायदेशीर बंधने असल्यास ती समजून घेण्यासाठी आपण जबाबदार आहात. या वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या समुपदेशन सेवा वापरण्याच्या परिणामी आपल्यावर होणार्‍या कोणत्याही कायदेशीर परिणामांसाठी वेबसाइट जबाबदार राहणार नाही.
 • आपण या वेबसाइटच्या “आमच्याशी संपर्क साधा आणि / किंवा लाईव्ह चॅट करा” या विभागात समाविष्ट असलेला फॉर्म भरून आपले प्रश्न आमच्या समुपदेशकांसह सामायिक कराल.
 • वेबसाइटचा ‘आमच्याशी संपर्क साधा’ विभाग वापरताना, आपल्याला आपला ईमेल-पत्ता द्यावा लागेल जेणेकरून आमच्या/आमचे समुपदेशक आपल्या विनंतीच्या आधारावर आपल्याला संबंधित माहिती ईमेल पाठवून देऊ शकतील.
 • वेबसाइटचा “आमच्याशी संपर्क साधा आणि लाईव्ह चॅट करा” विभाग त्या महिलांना दिला जातो ज्यांनी मेडिकल गर्भपाताबद्दल माहिती शोधण्याचा निर्णय स्वतंत्रपणे घेतला आहे आणि त्याचा गैरवापर केला जाऊ नये.
 • आपल्याला ऑनलाइन समुपदेशन सेवा वापरण्यासाठी कोणत्याही वेळी शुल्क आकारले जाणार नाही.
 • ऑनलाईन भेट पूर्ण करणे ही आमची समुपदेशन सेवा ऍक्सेस करण्याची अनिवार्य आवश्यकता आहे.
 • आपल्या आरोग्याबद्दल अचूक आणि संपूर्ण माहिती प्रदान करण्यासाठी आपण जबाबदार आहात. कोणतीही माहिती न सांगणे आम्हाला आपल्याला योग्य सल्ला देण्यापासून रोखू शकते.
 • आमच्या लाईव्ह चॅट आणि समुपदेशन सेवांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आमच्या गोपनीयता धोरणाच्या अटींनुसार आणि युरोपियन युनियन जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशनने (GDPR) दिलेल्या मानकांच्या अनुपालनानुसार आणि वैयक्तिक माहितीच्या संरक्षणाशी संबंधित वेगवेगळ्या क्षेत्रांमधील अन्य कायद्यांनुसार वैयक्तिक माहिती संग्रहित करण्यासाठी आणि वापरासाठी आपली स्पष्ट संमती देणे आवश्यक आहे.
 • आपल्याला अधिक चांगली समुपदेशन सेवा देण्यासाठी आपली माहिती आमच्या पॅनलमध्ये असलेल्या मेडिकल प्रॅक्टिशनर किंवा डॉक्टरांसह सामायिक केली जाऊ शकते.
 • आम्ही आमच्या सेवांच्या कार्यक्षमतेबद्दल किंवा मेडिकल गर्भपाताच्या तर्‍हा आणि पद्धतींबद्दल कोणतेही प्रतिनिधित्व किंवा हमी न देता ‘जशी आहे तशी’ सेवा देतो. आपल्याला समुपदेशक सेवा संबंधित, उपयुक्त, समाधानकारक किंवा आपल्या गरजेसाठी अनुकूल असतील का याबद्दल आम्ही कोणतेही प्रतिनिधित्व किंवा हमी देत ​​नाही.

दायित्वाचे अस्वीकरण

कोणत्याही परिस्थितीत वेबसाइट कोणत्याही प्रकारच्या नुकसान किंवा हानीस जबाबदार राहणार नाही, यामध्ये कोणीही केलेला या वेबसाइटचा किंवा सेवेचा वापर, वेबसाइटवर पोस्ट केलेली कोणतीही सामग्री किंवा आमच्या समुपदेशकांनी सामायिक केलेली सामग्री, किंवा वेबसाइटच्या वापरकर्त्यांदरम्यान होणारे कोणतेही संवाद, ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन, यामधून झालेली वैयक्तिक इजा किंवा मृत्यू समाविष्ट आहे.

या वेबसाइटशी जोडणे

आपण आमच्या होम पेजशी जोडू शकता, जोपर्यंत आपण योग्य आणि कायदेशीर मार्गाने असे करता जेणेकरून आमची प्रतिष्ठा खराब होणार नाही किंवा तिचा गैरफायदा घेतला जाणार नाही परंतु आमच्या तर्फे कोणत्याही प्रकारचा संबंध, मान्यता किंवा समर्थन नसताना ते दर्शवणारी लिंक आपण स्थापित करू नये. आपण आपल्या मालकीच्या नसलेल्या कोणत्याही वेबसाइटशी जोडले जाऊ नये. ही वेबसाइट इतर कोणत्याही साइटवर फ्रेम केली जाऊ नये किंवा आपण होमपेजव्यतिरिक्त या वेबसाइटच्या कोणत्याही भागासाठी आपण लिंक तयार करू शकत नाही. आम्हाला लिंक करण्याची अनुमति मागे घेण्याचा हक्क आहे.

ट्रेडमार्क, व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमा आणि तृतीय पक्षाच्या कॉपीराइटच्या मालकीचे अस्वीकरण

याउलट स्पष्टपणे नमूद केल्या शिवाय या वेबसाइटवर वैशिष्टिकृत केल्या गेलेल्या सर्व व्यक्ति (त्यांची नावे आणि प्रतिमा समाविष्ट करून), तृतीय पक्ष ट्रेडमार्क आणि सामग्री, या वेबसाइटशी कोणत्याही प्रकारे संबंधित, जोडलेले किंवा संलग्न नाहीत. आणि आपण अशा कनेक्शन किंवा संबद्धतेच्या अस्तित्वावर अवलंबून राहू नये. या वेबसाइटवर वैशिष्ट्यीकृत कोणतेही ट्रेडमार्क / नावे संबंधित ट्रेडमार्क मालकांच्या मालकीचे आहेत. जिथे ट्रेडमार्क किंवा ब्रँड नावाचा उल्लेख केला जातो तो पूर्णपणे उत्पादने आणि सेवांचे वर्णन करण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी वापरला जातो आणि अशी उत्पादने किंवा सेवा वेबसाइट द्वारे मान्यताप्राप्त केल्या जातात किंवा वेबसाइटशी जोडलेल्या आहेत असे विधान कोणत्याही प्रकारे केले जात नाही.

नुकसानभरपाई

आपल्या या वेबसाइटच्या वापरामुळे किंवा आपण सेवा अटींचे उल्लंघन केल्याने उद्भवलेले कोणतेही आणि सर्व तृतीय पक्षाचे दावे, दायित्व, हानी आणि / किंवा खर्च (कायदेशीर फीसह परंतु त्यापुरता मर्यादित नाही) यांपसून आपण वेबसाइट, त्याचे संचालक, अधिकारी, कर्मचारी, सल्लागार, एजंट आणि संलग्नके समुपदेशकांसहित यांना नुकसान भरपाई देण्यास, त्यांचा बचाव करण्यास आणि त्यांना निरपराधी मानण्यास सहमति देता.

वैविध्य

वेबसाइटला तिच्या स्वेच्छाधीन शक्तीने कोणत्याही वेळी आणि सुचनेशिवाय या वेबसाइटच्या सेवा आणि/किंवा कोणतेही पृष्ठ दुरुस्त करण्याचा, काढण्याचा किंवा बदलण्याच्या अधिकार असेल.

अग्राह्यता

सेवा शर्तींचा कोणताही भाग अंमलात आणण्यायोग्य नसल्यास (आम्ही आपल्याबद्दल असलेली आमची जबाबदारी काढत असल्यास) सेवां शर्तींच्या इतर कोणत्याही भागाच्या अंमलबजावणीवर परिणाम होणार नाही. इतर सर्व कलम पूर्णपणे लागू आणि प्रभावी आहेत. शक्य असेल तोपर्यंत कोणताही कलम / पोट-कलम किंवा कलम / पोट-कलमाचा काही भाग उर्वरित भाग वैधपणे प्रस्तुत करण्यासाठी खंडित केला जाऊ शकत असेल तर, त्यानुसार त्या कलमाचे स्पष्टीकरण केले जाईल. वैकल्पिकरित्या, आपण सहमति देता की कलम दुरुस्त करुन त्याचे अशा प्रकारे वर्णन केले जाईल जे कायद्याने परवानगी दिलेल्या कलम / पोट-कलमाच्या मूळ अर्थाशी जवळचे असेल.

तक्रारी

आम्ही तक्रारींचे निवारण प्रक्रिया राबवितो जी आम्ही पहिल्यांदा उद्भवलेल्या विवादांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी वापरू, कृपया आपल्याकडे काही तक्रारी किंवा टिप्पण्या असल्यास आम्हाला कळवा.

माफी

आपण या अटींचा भंग केल्यास आणि आम्ही कोणतीही कारवाई न केल्यास आपण ज्या परिस्थितीत या शर्तींचा भंग करता त्या इतर कोणत्याही परिस्थितीत आमचे अधिकार आणि उपाय वापरण्यास आम्ही पात्र आहोत.

संपूर्ण करार

वरील सेवा शर्ती पक्षांचा संपूर्ण करार आहेत आणि आपण आणि वेबसाइट मधील कोणत्याही आणि सर्व पूर्वीच्या आणि समकालीन करारांना अधिग्रहित करतात. सेवा शर्तींच्या कोणत्याही तरतूदीची कोणतीही माफी केवळ तेव्हाच प्रभावी असेल जेव्हा ती वेबसाइटच्या संचालकांनी लेखी स्वरुपात आणि सही करून दिली असेल.

Last updated on 11/02/2021