आम्ही कोण आहोत आणि सुरक्षित गर्भपातास प्रोत्साहन का देतो?

safe2choose एक सामाजिक एंटरप्राइज आहे जे पुनरुत्पादात्मक स्वास्थ्य आणि सुरक्षित गर्भपाताच्या उपलब्धतेसाठीच्या एका जागतिक चळवळीचा भाग आहे.

safe2choose एक ऑनलाइन समुपदेशक आणि माहिती देणारे प्लॅटफॉर्म आहे जे गोळ्यांद्वारे किंवा सर्जिकल गर्भपात करू इछिणार्‍या महिलांना समर्थन देते आणि गरज पडल्यास, त्यांची शिफारस विश्वसनीय, प्रशिक्षित आणि प्रो-चॉइस आरोग्यसेवा प्रदात्यांना करते.

आमच्या टीममध्ये बहुभाषिक समुपदेशक, मेडिकल डॉक्टर आणि सार्वजनिक आरोग्य आणि जागतिक विकासाच्या क्षेत्रातील तज्ञांचा समावेश आहे जे एकत्र येऊन आपल्याला सुरक्षित गर्भपाताबद्दल अचूक माहिती देतात. महिलांचे शरीर आणि पुनरुत्पादात्मक आरोग्य याबाबत त्यांचे स्वतःचे निर्णय घेण्याबद्दल आम्ही महिलांना समर्थन देतो आणि त्यांचा आदर करतो.

safe2choose आपल्याला काय देऊ शकते?

safe2choose हे सुरक्षित मेडिकल आणि सर्जिकल गर्भपाताबद्दल ईमेल आणि लाईव्ह चॅट द्वारे शास्त्रीय माहिती आणि समुपदेशन प्रदान करते.

गर्भधारणा सुरक्षितपणे संपवण्याच्या अनेक प्रक्रिया आहेत. safe2choose मध्ये, आम्ही गर्भधारणेच्या पहिल्या 11 आठवड्यांमध्ये गोळ्यांद्वारे केला जाणारा गर्भपात आणि मॅन्युअल वॅक्युम अस्पिरेशन गर्भपात याबद्दल माहिती सामायिक करण्यात तज्ञ आहोत.
ज्या महिलांना गर्भपाताच्या गोळ्या हव्या आहेत किंवा सर्जिकल गर्भपातासाठी अधिक समर्थन हवे आहे अशा महिलांची, safe2choose चे समुपदेशक जवळच्या विश्वसनीय आरोग्यसेवा प्रदात्याला शिफारस करतात.

आपल्याला आमच्या सेवांबद्दल कोणतेही प्रश्न असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा. आपल्याला समर्थन देण्यात आम्हाला आनंद होईल.

आमचे ध्येय:

जगभरातील सर्व महिलांना मेडिकल गर्भपाताच्या गोळ्यांबद्दल अचूक आणि वैयक्तिकृत माहितीशी जोडणे ज्यामुळे त्या त्यांना हवे तिथे, हवे तेव्हा आणि त्यांना ज्यांच्यासह सर्वात जास्त मोकळे वाटते त्यांच्याकडून सुरक्षित गर्भपात करता येईल.

आमची बांधिलकी:

  • आम्ही सुरक्षित गर्भपाताबद्दल सर्वात अलीकडच्या अद्ययावत वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित माहिती देतो.
  • आम्ही अशा समुपदेशन सेवा मोफत देतो ज्या सुरक्षित, गोपनीय, सोयिस्कर, कोणतेही मतप्रदर्शन नसलेल्या आणि कलंकरहीत असतात.
  • आम्ही गरज भासेल तेव्हा आपली शिफारस एका विश्वसनीय, प्रो-चॉइस संघटनेला करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो.
  • आम्ही मैत्रीपूर्ण व्यवहार असलेले, समर्थन देणारे आणि सहज पोहोचण्यायोग्य आहोत.
  • आपल्या स्वतःच्या आरोग्य आणि आयुष्याबद्दल आपण स्वतः निर्णय घेण्याच्या आपल्या अधिकाराचा आम्ही आदर करतो.

Last updated on 11/02/2021